Wed. Oct 5th, 2022

#WorldHomeopathyday: आजाराच्या मूळाशी पोहोचणारी उपचारपद्धती

होमिओपॅथी एक औषधोपचार पद्धतींचा सुरक्षित आणि स्वस्त पर्याय आहे. आज 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा होतो. हा पर्याय 1796 ला सॅम्युअल हॅनिमॅन यांनी शोधून काढला.  “समानाला समान बरे करते” या एका महत्त्वाच्या तत्त्वावर ही औषधोपचार पद्धती आधारलेली आहे. उदाहरणार्थ काट्याने काटा निघतो त्याप्रमाणे हे आहे. या प्रकाराला समचिकित्सा म्हणतात.

सॅम्युअल हॅनिमॅन

समचिकित्सेच्या नियमानुसार, निरोगी माणसामध्ये  एखाद्या आजाराची लक्षणे उद्भवत असल्यास  त्या आजारावर किंवा तशी लक्षणे असलेल्या आजारावर औषध म्हणून तोच पदार्थ हलक्या प्रमाणात दिला जातो.

होमिओस म्हणजे सारखे आणि पॅथॉस म्हणजे रोग अथवा रोगलक्षणे असा अर्थ आहे.

जे आजार इतर औषधोपचारपद्धतीने बरे होऊ शकत नाहीत ते आजार बरे करण्याचा दावा होमिओपॅथीमध्ये केला जातो.

मधुमेह, संधिवात या आजारांचा यामध्ये समावेश होतो.

होमिओपॅथी ही उपचार पद्धती आहे जिथे मानसिक स्थितीचा किंवा मनाचा विचार केला जातो.

त्यासाठी पेशंटच्या व्यक्तिमत्त्वाचा, आवडीनिवडीचा, सवंयींचा विचार घेऊन औषध दिले जाते.

यासाठी एकाच आजारावर दोन वेगळ्या रोग्याला वेगळी औषधं दिली जाऊ शकतात.

कसा लागला शोध?

सॅम्युअल हॅनिमॅन हे कुलेनस मटेरिआ मेडिका या पुस्तकाचा अनुवाद करत असताना सींकोनाच्या फांदीपासून मलेरियाचे औषध बनवलं जाते.हे त्यांच्या वाचनात आलं.

हॅनिमॅन यांनी प्रयोग करण्यासाठी  फांदीचा अर्क घेतला होता, तेव्हा मलेरिया सारखीच थंडी, ताप व सांधेदुखीचा त्रास त्यांना जाणवू लागला.

त्यावरून असा निष्कर्ष लागला की निरोगी मनुष्याला जर असा अर्क दिला तर तो आजारी पडतो पण तेच आजारी माणसाला दिले तर आजार दूर होतो.

म्हणजेच सिमिलिया सिमिलिबस क्यूर्युनट्युर या सुत्राचा मध्यभागी ठेवून होमिओपॅथिची निर्मिती केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.