Wed. Jun 29th, 2022

अँटार्कटीकामधील महाकाय आईसबर्गचा तुकडा तुटला; न्यूयॉर्क बेटापेक्षा मोठा आकार

अँटार्कटीका : पृथ्वीवरील वातावरण दिवसेंदिवस उष्ण होतं आहे शिवाय वाढत प्रदुषणामुळे पृथ्वी ही धोक्यात आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे बर्फ आणि बर्फाच्या चादरी या वितळत चालला आहे आणि त्यामुळे समुद्राची पातळी सतत वाढ आहे. समुद्राची पातळी वाढल्यामुळे मुंबई सारख्या भागातील शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. नुकतचं अँटार्कटीकाच्या किनाऱ्यापासून ते स्पेनच्या माजोरका बेटापर्यंत बर्फाचा एक विशाल तुकडा पाण्यात पडला होता. युरोपियन स्पेस एजन्सीनुसार, हा आइसबर्ग A-76 (Iceberg) अँटार्कटीकामधील रॉनी आईस शेल्फच्या पश्चिमेलाकडून तुटला आहे आणि तो वेडेल समुद्रात तरंगत आहे. 170 किलोमीटर लांब असलेला हा बर्फाता तुकडा 25 किलोमीटर रूंद आहे. सेटेलाइट आणि विमानाने घेतलेल्या फोटोमधून हे स्पष्ट होत आहे की, हा जगातील आतापर्यंतचा सर्वात महाकाय बर्फाचा तुकडा आहे. या तुकड्याच्या आकारावरून असे अनुमान लावले जात आहे की, तो न्यूयॉर्क बेटापेक्षा मोठे आहे आणि प्यूर्टो रिकोच्या अर्ध्या आकाराचा आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे बर्फ हा वितळत आहे. शास्त्रज्ञांना अंदाजानुसार जर हा तुकडा एखाद्या बेटावर आढळला असता तर खूप मोठे नुकसान झाले असते. मात्र सुदैवाने या विशाल बर्फाच्या तुकड्याचे छोटे छोटे तुकडे झाले आहेत. अँटार्कटीकामधील तापमान ग्लोबल वार्मिंगमुळे अँटार्कटीकामधील तापमान वेगाने वाढत आहे. बर्फाच्या चादरी हळूहळू वितळू लागल्या आहेत. हिमनद्याही आता वितळायला सुरवात झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षी आईसबर्ग A-68A तुटून वेगळा झाला होता. हा तुकडा अँटार्कटीकामधील सर्वात मोठा होता. तसेच समुद्राची पातळी ही वाढत आहे. 1880 पासून, ते आतापर्यंत समुद्राच्या पातळत सरासरी 9 इंचने वाढली आहे असं शास्त्रज्ञांनीचे मत आहे. ग्रीनलँड आणि अँटार्कटीकामध्ये झपाट्याने बर्फ वितळत आहे. नेचर मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, जगातही दुसऱ्या ठिकाणचे हिमनग ही वेगाने वितळत आहे. त्यामुळे असंच सगळं चालत राहिलं तर किनाऱ्यालगतची शहरे ही पाण्याखाली जाऊन नष्टं होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.