Sat. May 25th, 2019

ISSF World Cup : सौरभची विश्वविक्रमी सुवर्ण कामगिरी

18Shares

भारताचा 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरी याने भारतात सुरु असणाऱ्या ISSF shooting World Cup स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत रविवारी विश्वविक्रम केला.

अवघ्या 16 वर्षी ही कामगिरी बजावल्याने सौरभचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सौरभने रचला इतिहास

१० मीटर एअर पिस्टल पुरुष गटात त्याला245गुण मिळाले. आणि त्याला थेट ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले.

१० मीटर एअर पिस्तुल प्रकारात आशियाई स्पर्धेतही सौरभने सुवर्णपदक पटकावले होते. यावेळी त्याला 240.7 गुण मिळाले होते.

सौरभने प्रथमच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय नेमबाजी गटात सहभाग घेवून इतिहास रचला आहे.

या स्पर्धेत त्याने 245 गुण मिळवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूतक केलं आहे.

सौरभच्या या सुवर्णकमाईमुळे भारताच्या खात्यात दुसरे सुवर्णपदक जमा झालं आहे.

याआधी शनिवारी अपूर्वी चंदेला हिने 10 मी. एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे.

सर्बियाच्या दामीर मायकेसने 239.3 गुणांसह रौप्य पदक तर चीनच्या पँग वेईने 215.2गुणांसह या स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं आहे.

सौरभची आतापर्यंतची कामगिरी

डिसेंबर 2017 मध्ये आशियाई युवा ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धेत ज्युनिअर विश्वविक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक

2018 साली आशियाई स्पर्धेत वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक

जून 2018 मध्ये जर्मनीत झालेल्या आयएसएसएफ ( International School Sport Federation) ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक

सप्टेंबर 2018 मध्ये झालेल्या दक्षिण कोरियातील आयएसएसएफ स्पर्धेत ज्युनिअर 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक

ऑक्टोबर 2018 मध्ये ब्युनॉस आयर्स येथे झालेल्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक

भारतात सुरु असणाऱ्या ISSF shooting World Cup स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत विश्वविक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *