Sun. Jan 16th, 2022

जगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ

जगातील सर्वांत मोठी आरोग्य सेवा ‘आयुष्मान भारत’ योजना आजपासून सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झारखंडची राजधानी रांची येथून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. 25 सप्टेंबरपासून पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीपासून या योजनेची अमलबजावणी होईल. सुरुवातीला जम्मू-काश्मिर, मणीपूर, मिझोरम, नागालँड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा या राज्यांमधल्या 1280 रुग्णालयांत ही योजना सुरू होईल.

15 हजारांपेक्षा जास्त सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश आहे.

‘आयुष्मान भारत’ योजनेमुळे देशातल्या 10 कोटींपेक्षा आधिक कुटुंबांना आणि पर्यायाने 25 कोटींहून अधिक लोकसंख्येला फायदा मिळणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य विमा योजना आणि ज्येष्ठ नागरिक विमा योजनेऐजी ‘आयुष्मान भारत’ योजना लागू होत आहे.

या योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण मिळेल. यासाठी वयाची कोणतीही अट नसेल.

देशातील दीड लाख गावांमध्ये आरोग्य केंद्रं सुरू केली जातील. या केंद्रावर नियमित तपासणी आणि उपचार होतील.

ही योजना कॅशलेस असल्यामुळे रुग्णाच्या उपचारांचा खर्च थेट रुग्णालायाला दिला जाईल.

या योजनेत तब्बल 1350 वैद्यकीय सेवांचा समावेश आहे.

आधीपासून असलेल्या आजारांचाही यामध्ये समावेश आहे.

योजनेचे लाभार्थी नेमके कोण?

 

2011 च्या सामाजिक आणि आर्थिक जनगणनेनुसार ग्रामीण भागातील 8.3 कोटी आणि शहरी भागातील 2.33 कोटी कुटुंबांचा यामध्ये समावेश आहे.

labharthi.png

 

नॅशनल हेल्थ एजन्सीने आयुष्यमान योजनेची https://mera.pmjay.gov.in ही वेबसाईट लाँच केली आहे. या वेबसाईटवर आपला मोबाइल नंबर टाका.

किंवा 14555 या क्रमांकावर फोन करून माहिती घेऊ शकता.

या योजनेसंदर्भात माहिती देण्यासाठी आयुष्मान मित्रही नेमण्यात आले आहेत. आयुष्मान मित्र रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करतील. रुग्णांना भरती करण्यापासून ते त्यांना विम्याची रक्कम मिळवून देण्यापर्यंतचं काम हे मित्र करतील.

SECCच्या डेटाबेसनुसार पात्रतेचे मापदंड ठरवण्यात आले आहेत. ग्रामीण श्रेणीमध्ये D 1 ते D 7 असे पात्रतेचे विविध निकष आहेत. तर शहरी भागांत व्यवसायांवर पात्रतेचे निकष ठरवण्यात आले आहेत.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *