अफगाणिस्तान, १४ मार्च, २०२४,प्रतिनिधी : अफगाणिस्ताला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.३ एवढी होती. त्याचे केंद्र जमिनीपासून १४६ किलोमीटर खोलीवर होते. सध्या कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही, मात्र भूकंपाची तीव्रता लक्षात घेता मोठे नुकसान झाले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.