Wednesday, February 18, 2026 09:32:07 AM

Trade Deal India US: भारत-अमेरिकेत ऐतिहासिक व्यापार करार; पण अमेरिका आता भारताला काय विकणार?

. सध्या भारत प्रामुख्याने चीन, रशिया आणि UAE मधून मोठ्या प्रमाणावर आयात करतो. मात्र, या नव्या करारामुळे अमेरिकेकडून होणाऱ्या आयातीत मोठी वाढ होणार आहे.

trade deal india us  भारत-अमेरिकेत ऐतिहासिक व्यापार करार पण अमेरिका आता भारताला काय विकणार

Trade Deal India US: भारत आणि अमेरिका यांच्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण व्यापार करार झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, या करारामुळे भारताला अमेरिकेतून तब्बल 500 अब्ज डॉलर किमतीच्या वस्तू आयात कराव्या लागतील. सध्या भारत प्रामुख्याने चीन, रशिया आणि UAE मधून मोठ्या प्रमाणावर आयात करतो. मात्र, या नव्या करारामुळे अमेरिकेकडून होणाऱ्या आयातीत मोठी वाढ होणार असून, यात प्रामुख्याने कृषी आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असेल.

सध्याची आयात स्थिती आणि चीनचे वर्चस्व
परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या (DGFT) 2024-25 च्या आकडेवारीनुसार, भारताची एकूण आयात 721.20 अब्ज डॉलर इतकी आहे. यामध्ये चीन हा 113.44 अब्ज डॉलरसह भारताचा सर्वात मोठा आयातदार देश ठरला आहे. रशिया (63.81 अब्ज डॉलर) आणि UAE (63.40 अब्ज डॉलर) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत, तर अमेरिका 45.62 अब्ज डॉलरसह चौथ्या क्रमांकावर आहे. चीनकडून प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री आणि रसायने आयात केली जातात, ज्यामुळे चीनसोबतची व्यापार तूट 106 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

हेही वाचा  - India US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब; 10 अब्ज डॉलर्सच्या भारतीय मालाला अमेरिकेत मिळणार 'मोफत' एन्ट्री

भारत नक्की काय खरेदी करतो?
भारताच्या एकूण आयातीमध्ये सर्वाधिक वाटा कच्च्या तेलाचा (218.45 अब्ज डॉलर) आहे. त्याखालोखाल इलेक्ट्रिकल यंत्रसामग्री (88.59 अब्ज डॉलर), मोती-मौल्यवान दगड आणि अणुभट्टी उपकरणांचा क्रमांक लागतो. अमेरिकेकडून भारत सध्या मुख्यत्वे फळे, काजू, भाजीपाला आणि मासे यांसारख्या खाद्यपदार्थांची आयात करतो. आता नव्या करारानुसार ही मर्यादा 500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्यात येणार असल्याने अमेरिकन उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ मोठी दारे उघडणार आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या