Sanctions on Iran Oil Industry: इराण-इस्त्रायल युद्धादरम्यान इस्त्रायला पाठींबा देऊन अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केला होता. आता अमेरिकेने इराणला आणखी मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने इराणच्या सुमारे एक अब्ज डॉलर्सच्या तेल व्यापारावर निर्बंध लादले आहेत. इराणच्या तेल व्यापाराला हिजबुल्लाहकडून आर्थिक मदत मिळण्यास बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने इराणवर लादलेल्या निर्बंधांची माहिती दिली. ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट म्हणाले की, इराणशी अणुकरार करण्यापूर्वी तेल व्यापारासाठी आर्थिक मदत थांबवण्यासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
इराणच्या कच्च्या तेलापासून हिजबुल्लाहला फायदा -
दरम्यान, अमेरिकेच्या ट्रझरी सेक्रेटरींनी सांगितले की, अमेरिकेला हिजबुल्लाहच्या नियंत्रणाखालील अल-कर्द अल-हसन या वित्तीय संस्थेबद्दल माहिती मिळाली आहे, ज्याच्या अधिकाऱ्यांनी लाखो डॉलर्सचे व्यवहार केले आहेत, ज्यामुळे हिजबुल्लाहला फायदा होत आहे. ही संस्था इराकी व्यापारी सलीम अहमद सईदच्या कंपन्यांसाठी नफा कमवत आहे.
हेही वाचा - काय सांगता!! जपानने तयार केले कृत्रिम रक्त
हिजबुल्लाहची ही संस्था सलीमच्या कंपन्यांना निधी देते. सलीमच्या कंपन्या 2020 पासून इराणकडून तेल खरेदी करत आहेत आणि ते इराकच्या तेलात मिसळत आहेत, ज्यामुळे त्यांना अब्जावधी डॉलर्सचा नफा होत आहे. इराणकडून कच्च्या तेलाच्या या खरेदीचा थेट फायदा हिजबुल्लाहला होत आहे, परंतु अमेरिका हे होऊ देणार नाही, असंही ट्रेझरी यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा - 'आत्मसमर्पण' हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही.. इराणच्या अली खामेनींचे ट्रम्प यांना प्रत्युत्तर
अमेरिकेच्या निर्बंधांमुळे काय परिणाम होणार?
दरम्यान, ट्रेझरी यांनी सांगितले की, अमेरिका इराणच्या महसूल स्रोतांना लक्ष्य करत राहील, जेणेकरून इराणचा महसूल कमी होईल आणि देशात प्रादेशिक अस्थिरता वाढेल. अनेक तेल पुरवठा करणाऱ्या जहाजांवरही बंदी घालण्यात आली आहे, जे इराणचे तस्करी केलेले तेल गुप्तपणे तस्करांना पोहोचवतात. म्हणूनच, अमेरिकेने इराणी तेलाच्या बेकायदेशीर तस्करीत सहभागी असलेल्या 16 वित्तीय संस्था आणि समुद्री जहाजांवर कारवाई केली आहे. कारण, तेल विकून या संस्थांना मिळणारा पैसा दहशतवादी संघटना हिजबुल्लाह, हमास आणि हुथी बंडखोरांना पाठिंबा देतो. म्हणूनच, तेल व्यापारावर बंदी घालून हे उत्पन्न थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.