Saturday, June 14, 2025 03:53:24 AM

'दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत...'; अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांचे विधान

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी भारतातील काही नेत्यांचे शिष्टमंडळ सध्या अमेरिकेत आहे. भारतीय शिष्टमंडळाने शुक्रवारी लँडौ यांची भेट घेतली.

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत  अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांचे विधान
Edited Image, X

वॉशिंग्टन: ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षानंतर पहिल्यांदाच अमेरिकेकडून मोठे विधान समोर आले आहे. अमेरिकेचे उप-परराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लँडौ यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला सांगितले की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत खंबीरपणे उभी आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी भारतातील काही नेत्यांचे शिष्टमंडळ सध्या अमेरिकेत आहे.  भारतीय शिष्टमंडळाने शुक्रवारी लँडौ यांची भेट घेतली.

भारतीय दूतावासाने 'एक्स'वर यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, डॉ. शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाने अमेरिकेचे उप-परराष्ट्रमंत्री लँडौ यांच्याशी चांगली आणि स्पष्ट चर्चा केली. भारतीय शिष्टमंडळाने त्यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या क्रूरतेबद्दल आणि 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल माहिती दिली. 

हेही वाचा पंतप्रधान मोदींना मिळाले G7 शिखर परिषदेचे निमंत्रण! कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला फोन

तथापि, परराष्ट्रमंत्री लँडौ यांनी 'एक्स' वरील 'पोस्ट' द्वारे सांगितले की, भारतीय संसदीय प्रतिनिधींसोबतची ही भेट शानदार होती. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत खंबीरपणे उभी आहे. आम्ही अमेरिका-भारत धोरणात्मक संबंधांवर चर्चा केली, ज्यामध्ये दोन्ही देशांमध्ये विकास आणि समृद्धी वाढवण्यासाठी व्यापार आणि व्यावसायिक संबंधांचा विस्तार करणे समाविष्ट आहे.  

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांची शी जिनपिंग यांच्याशी फोनवर चर्चा; कोणत्या मुद्द्यांवर झाली खलबत?

याशिवाय, दहशतवादाविरुद्धच्या युद्धात भारताला भक्कम पाठिंबा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लँडौ यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आणि दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीत अमेरिकेच्या भारताला असलेल्या भक्कम पाठिंब्याची पुष्टी केली. निवेदनानुसार, शिष्टमंडळाने लँडौ यांच्याशी दोन्ही देशांमध्ये आर्थिक वाढ आणि समृद्धीला चालना देण्यासाठी व्यापार आणि व्यावसायिक संबंधांचा विस्तार करण्यासह प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध वाढविण्याच्या महत्त्वावर चर्चा केली. 
 


सम्बन्धित सामग्री