Friday, July 11, 2025 11:09:49 PM

काय सांगता!! जपानने तयार केले कृत्रिम रक्त

शास्त्रज्ञांनी असे कृत्रिम रक्त तयार केले आहे जे कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला दिले जाऊ शकते. विशेष म्हणजे हे कृत्रिम रक्त खोलीच्या तापमानावर दोन वर्षे रेफ्रिजरेटरशिवाय सुरक्षित राहू शकते.

काय सांगता जपानने तयार केले कृत्रिम रक्त
Japan Created Artificial Blood
Edited Image

Japan Created Artificial Blood: अनेकदा अपघातानंतर किंवा शरीरात रक्त कमी झाल्यानंतर डॉक्टर आपल्याला बाहेरील रक्त चढवण्याचा पर्याय देत असतात. अशावेळी अनेकदा त्याच रक्तगटाचे रक्त मिळणे खूपचं कठीण होते. परंतु, आता जपानच्या नवीन शोधामुळे ही समस्या कायमची संपुष्टात येऊ शकते. शास्त्रज्ञांनी असे कृत्रिम रक्त तयार केले आहे जे कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला दिले जाऊ शकते. विशेष म्हणजे हे कृत्रिम रक्त खोलीच्या तापमानावर दोन वर्षे रेफ्रिजरेटरशिवाय सुरक्षित राहू शकते. त्यामुळे युद्ध, नैसर्गिक आपत्ती, दुर्गम भागात किंवा अपघाताच्या वेळी जीव वाचवण्यासाठी हे कृत्रिम रक्त अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. 

कृत्रिम रक्त कसे तयार करण्यात आले? 

टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, जपानच्या नारा मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर हिरोमी सकाई आणि त्यांच्या टीमने एक विशेष प्रकारचे 'कृत्रिम रक्त' तयार केले आहे, ज्याला 'हिमोग्लोबिन वेसल' (HbVs) म्हणतात.

HbV कसे बनवले जाते?

यामध्ये, जुन्या दान केलेल्या किंवा कालबाह्य झालेल्या रक्तातून हिमोग्लोबिन काढले जाते. नंतर ते लिपिड बंद केले जाते आणि खूप लहान पेशी बनवल्या जातात, ज्यांचा आकार फक्त 250 नॅनोमीटर असतो. हे आकाराने इतके लहान असतात की ते शरीराच्या बारीक नसांमधून सहजपणे जाऊ शकतात. या रक्ताचा रंग जांभळा असतो कारण ते शरीरात प्रवेश करेपर्यंत ऑक्सिडायझेशन करत नाहीत.

कृत्रिम रक्ताचे फायदे  - 

कृत्रिम रक्त कोणत्याही व्यक्तीला दिले जाऊ शकते. यामुळे संसर्गाचा धोका राहणार नाही. याशिवाय, ते रेफ्रिजरेटरशिवाय 2 वर्षे ठेवता येते. आपत्कालीन परिस्थितीत, ते दुर्गम भागात, लष्करी छावण्यांमध्ये किंवा रक्त उपलब्ध नसलेल्या आपत्तीच्या वेळी खूप उपयुक्त ठरेल. सुरुवातीच्या प्रयोगांमधून असे दिसून आले की हे रक्त प्राण्यांमध्ये आणि निरोगी मानवांमध्ये कोणत्याही दुष्परिणामांशिवाय वापरले जाऊ शकते. 

हेही वाचा - SL vs BAN: खेळाडूंची उडाली धांदल! क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानावर घुसला 7 फूट लांब साप, पहा व्हिडिओ

अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी उंदरांच्या 90% रक्तात हे बनावट रक्त टाकले. परंतु, तरीही त्यांचे रक्तदाब, ऑक्सिजन आणि वायूचे प्रमाण सामान्य राहिले. त्यांना 2 आठवडे डोस देण्यात आला. मात्र, उंदरांच्या कोणत्याही अवयवावर कोणताही वाईट परिणाम झाला नाही. 

हेही वाचा - अजब प्रकार; मद्यपी महिलेने चालवली रेल्वे रुळावर गाडी

मानवांवरही करण्यात आली कृत्रिम रक्ताची चाचणी -

दरम्यान, 2020 मध्ये, जपानी सरकार आणि होक्काइडो विद्यापीठाने पहिल्यांदाच मानवांवर त्याची चाचणी मंजूर केली. तीन गटांना 10 मिली, 50 मिली आणि 100 मिली डोस देण्यात आले. परंतु,  यातील कोणालाही कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. 2025 मध्ये मानवांवर मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू झाल्या आहेत. जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर 2030  पर्यंत हे कृत्रिम रक्त रुग्णालयात वापरले जाऊ शकते. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. तसेच ते वैद्यकीय क्षेत्रासाठी वरदान ठरू शकते. 
 


सम्बन्धित सामग्री