Sunday, March 08, 2026 11:42:49 PM

TV Anchor Breaks Down: खोमेनींच्या मृत्यूची बातमी सांगताना वृत्तनिवेदक कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडला, पाहा भावूक क्षणाचा व्हायरल व्हिडीओ

&quotइस्लामिक क्रांतीचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह सैयद अली खोमेनी आता आपल्यात नाहीत,&quot हे शब्द उच्चारताना निवेदकाचा आवाज थरथरला.

tv anchor breaks down खोमेनींच्या मृत्यूची बातमी सांगताना वृत्तनिवेदक कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडला पाहा भावूक क्षणाचा व्हायरल व्हिडीओ

TV Anchor Breaks Down: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण देश हादरून गेला आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती अधिकृतपणे देताना सरकारी वाहिनीच्या वृत्तनिवेदकाला (अँकर) आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवता आले नाही. थेट प्रक्षेपणादरम्यान बातमी वाचताना अँकरचा कंठ दाटून आला आणि तो कॅमेऱ्यासमोरच धाय मोकलून रडला.

थेट प्रक्षेपणात भावूक क्षण
सरकारी वृत्तवाहिनीवर खोमेनी यांच्या मृत्यूची बातमी वाचायला सुरुवात करताच स्टुडिओतील वातावरण गंभीर झाले. "इस्लामिक क्रांतीचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह सैयद अली खोमेनी आता आपल्यात नाहीत," हे शब्द उच्चारताना निवेदकाचा आवाज थरथरला. नेत्याप्रती असलेल्या निष्ठेपोटी त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि हुंदके देतच त्याने ही बातमी देशवासियांपर्यंत पोहोचवली. हा भावूक प्रसंग पाहून इराणमधील प्रेक्षकही स्तब्ध झाले.

देशात 40 दिवसांचा दुखवटा
खोमेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यही (मुलगी, जावई आणि नातवंडे) या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून इराणच्या कॅबिनेटने तातडीची बैठक घेतली आहे. प्रशासनाने देशात 7 दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून पुढील 40 दिवस राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचे आदेश दिले आहेत. 

इराणमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आणि तणाव
खोमेनी यांच्या निधनानंतर इराणमध्ये विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे त्यांचे लाखो समर्थक रस्त्यावर उतरून अमेरिकेचा निषेध करत शोक व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे दडपशाहीतून मुक्तता मिळाल्याचा दावा करत काही विरोधकांनी सोशल मीडियावर आनंदही व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Pune Students Stranded In Dubai: स्टडी टूर पडली महागात; दुबईतील युद्धजन्य परिस्थिती दरम्यान पुण्यातील 80 विद्यार्थी अडकले

युद्धाचा भडका उडण्याची शक्यता
या घटनेनंतर इराणची 'रिव्होल्युशनरी आर्मी' आक्रमक झाली असून त्यांनी बदला घेण्याचा इशारा दिला आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले तीव्र करण्यात आले आहेत. मात्र, इस्त्रायलच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासमोर इराणचा दारूगोळा किती काळ तग धरू शकेल, याबाबत आता संरक्षण तज्ज्ञांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


सम्बन्धित सामग्री