Elon Musk New Political Party: अमेरिकन उद्योजक एलोन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वाद सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. दोघांकडून होणारे शाब्दिक हल्ले हे चर्चेचे कारण आहे. मस्कने कर विधेयकावर नाराजी व्यक्त केल्यानंतर, ट्रम्पने सोशल मीडियावर मस्कच्या वृत्तीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आता एलोन मस्क यांनी स्वत:चा नवीन राजकीय पक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मस्क यांच्या नवीन पक्षाची चर्चा अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातही सुरू झाली आहे. मस्क यांनी त्यांच्या नवीन पक्षाचे नाव 'द अमेरिका पार्टी' ठेवण्याचे संकेत दिले आहेत, जो त्यांच्या मते 80% लोकांचे प्रतिनिधित्व करेल.
अमेरिकेला नवीन राजकीय पक्षाची गरज -
दरम्यान, मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोल चालवला होता ज्यामध्ये त्यांनी विचारले होते की अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष स्थापन करावा का? पोलचे निकाल जाहीर करताना मस्क म्हणाले की, 80 टक्के लोकांना अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष स्थापन करायचा आहे. मस्कने एक्स वर लिहिले की जनतेने आपला निर्णय दिला आहे. अमेरिकेला आता एका राजकीय पक्षाची गरज आहे.
हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांची शी जिनपिंग यांच्याशी फोनवर चर्चा; कोणत्या मुद्द्यांवर झाली खलबत?
यापूर्वी, मस्कने असा दावा केला होता की ट्रम्प माझ्याशिवाय निवडणूक हरू शकले असते. मी त्यांच्या निवडणूक प्रचारात 259 दशलक्ष डॉलर्स खर्च केले. यानंतर, ट्रम्पने प्रत्युत्तर देत मस्कला देशद्रोही म्हटले आणि त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा दिला. अशा परिस्थितीत, जर मस्कने नवीन राजकीय पक्ष स्थापन केला तर ती अमेरिकेच्या इतिहासातील एक मोठी घटना असेल.
हेही वाचा - अमेरिकेत 12 देशांच्या नागरिकांना प्रवेश बंदी; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
मस्क यांची ट्रम्प सरकारच्या विधेयकावर टीका -
एलोन मस्क यांनी ट्रम्प सरकारच्या 'वन बिग ब्युटीफुल बिल'वर जोरदार टीका केली होती आणि त्याला 'घृणास्पद' विधेयक म्हटले होते. या विधेयकात ट्रम्प सरकारच्या खर्च योजनेचा समावेश आहे, ज्यामध्ये 2.4 ट्रिलियन डॉलर्सची तूट उघड झाली आहे. मस्क यांनी त्यावर जोरदार टीका केली आणि त्यानंतर 30 मे रोजी त्यांनी ट्रम्प सरकारमधील आपल्या पदावरून, म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) प्रमुख पदावरून राजीनामा दिला.