China Flying Cars Trial Production: चीनने वाहतुकीच्या भविष्यातील तंत्रज्ञानात आणखी एक महत्त्वपूर्ण झेप घेतली आहे. देशातील आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी एक्सपेंग (XPeng) हिच्या एरोहॅट (AeroHT) या उपकंपनीने जगातील पहिल्या ‘इंटेलिजंट फ्लाइंग कार फॅक्टरी’मध्ये उडत्या कारच्या चाचणी उत्पादनाला सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे पुढील पिढीच्या वाहतुकीच्या व्यावसायिकीकरणाच्या दिशेने चीनने महत्त्वाची झेप घेतली आहे.
30 मिनिटांत तयार होईल एक फ्लाइंग कार
दक्षिण चीनमधील ग्वांगझू शहरातील 120,000 चौ.मी. च्या या आधुनिक कारखान्यात लँड एअरक्राफ्ट कॅरियर नावाच्या मॉड्यूलर फ्लाइंग कारचे पहिले वेगळे करण्यायोग्य इलेक्ट्रिक विमान तयार करण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कारखान्याची उत्पादन क्षमता दरवर्षी 5,000 युनिट्स इतकी असून ती 10,000 युनिट्स पर्यंत वाढवली जाणार आहे. विशेष म्हणजे, या कारखाना दर 30 मिनिटांत एक फ्लाइंग कार तयार करण्यात येईल.
हेही वाचा - Apple ची नवी Gen AI Siri मार्च 2026 मध्ये येणार; गुगलच्या 'Gemini' मॉडेलची मदत घेण्याची शक्यता!
कंपनीला मिळाल्या 5,000 ऑर्डर्स
कंपनीच्या माहितीनुसार, उत्पादन सादर केल्यानंतर त्यांना सुमारे 5,000 फ्लाइंग कार्ससाठी ऑर्डर्स मिळाल्या आहेत. 2026 पासून या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि वितरण सुरू होणार आहे. चीन पॅसेंजर कार असोसिएशन (CPCA) च्या आकडेवारीनुसार, देशातील 50 हून अधिक ईव्ही उत्पादकांनी या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत 2.01 दशलक्ष इलेक्ट्रिक आणि प्लग-इन हायब्रिड वाहनांची निर्यात केली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत 51 टक्क्यांनी अधिक आहे.
हेही वाचा - ChatGPT policy change: OpenAI ने बदलले नियम! आता 'या' प्रश्नांची उत्तरं देणार नाही ChatGPT
दरम्यान, अमेरिकेतील टेस्ला कंपनीचे प्रमुख एलोन मस्क यांनीही काही महिन्यांत फ्लाइंग कारचे अनावरण करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर, अलेफ एरोनॉटिक्स (Alef Aeronautics) या अमेरिकन कंपनीनेही त्यांच्या उडत्या कारची यशस्वी चाचणी पूर्ण केली असून, कंपनीला 1 अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीच्या प्री-बुकिंग ऑर्डर्स प्राप्त झाल्या आहेत.
वाहतुकीच्या नव्या युगाची सुरुवात
तज्ज्ञांच्या मते, चीनचा हा प्रकल्प भविष्यातील ‘एअर मोबिलिटी’ तंत्रज्ञानासाठी दिशा ठरवणारा ठरेल. शहरांमधील गर्दी कमी करणे, प्रवासाचा वेळ वाचवणे आणि पर्यावरणपूरक वाहतूक उपलब्ध करून देणे हे या नव्या फ्लाइंग कार युगाचे उद्दिष्ट आहे.