Dalai Lama Successor: तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा लवकरच 90 वर्षांचे होणार आहेत. दलाई लामा यांच्या वाढत्या वयामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीबद्दल अनेकदा चर्चा होते. दलाई लामा यांचे खरे नाव तेन्झिन ग्यात्सो आहे. ते 14 वे दलाई लामा आहेत आणि त्यांचे उत्तराधिकारी 15 वे लामा म्हणून ओळखले जातील. दलाई लामा यांची निवड करण्याची ही प्रथा 600 वर्षांपासून सुरू आहे. आता दलाई लामा यांनी त्यांचा उत्तराधिकारी कधी निवडला जाईल हे उघड केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, दलाई लामा म्हणाले आहेत की त्यांच्या मृत्यूनंतर नवीन दलाई लामा निवडले जातील. धार्मिक नेत्यांच्या बैठकीच्या सुरुवातीला प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये दलाई लामा यांनी हे सांगितले. यासोबतच, उत्तराधिकारी निवडीबाबत दलाई लामा यांनी चीनवरही निशाणा साधला आहे. दलाई लामा यांनी त्यांच्या उत्तराधिकारी निवडीमध्ये चीनचा सहभाग नाकारला आहे. दलाई लामा म्हणाले आहेत की दलाई लामांची संस्था सुरू राहील. उत्तराधिकारी निवडण्याची जबाबदारी केवळ दलाई लामा यांच्या कार्यालयातील, गादेन फोड्रांग ट्रस्टच्या सदस्यांवर असेल.
हेही वाचा - लग्नानंतर जेफ बेझोसने केले 'पजामा पार्टी'चे आयोजन; पाहुण्यांना दिले 'हे' खास गिफ्ट्स
एक्सवरील त्यांच्या एका ट्विटमध्ये दलाई लामा यांनी म्हटलं आहे की, 'मी पुन्हा सांगतो की गादेन फोड्रांग ट्रस्टला भविष्यातील पुनर्जन्म ओळखण्याचा एकमेव अधिकार आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा इतर कोणालाही अधिकार नाही.'
हेही वाचा - 'आत्मसमर्पण' हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही.. इराणच्या अली खामेनींचे ट्रम्प यांना प्रत्युत्तर
दलाई लामा भारताच्या आश्रयाला का आले?
चीनने 1950 मध्ये तिबेटवर हल्ला केला होता. त्यानंतर 1959 मध्ये दलाई लामा तिबेटमधून पळून गेले. तेव्हापासून तिबेट चीनने व्यापला आहे. तेव्हापासून दलाई लामाभारतात निर्वासित जीवन जगत आहेत. सध्या दलाई लामा हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील मॅकलिओडगंज येथे राहतात.