US Work Visa: अमेरिकेत वर्क व्हिसा किंवा ग्रीन कार्ड मिळविण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. आता अर्जदारांना त्यांच्या बायोमेट्रिक डेटासह डीएनए नमुना (DNA Sample) सुद्धा सादर करावा लागणार आहे. हा प्रस्ताव अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (DHS) तयार केला असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने त्यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे. सध्या अमेरिकेत नागरिकत्व, आश्रय, वर्क परमिट किंवा कायमस्वरूपी निवास (Green Card) मिळविताना अर्जदारांना फिंगरप्रिंट्स आणि इतर बायोमेट्रिक डेटा सादर करावा लागतो. परंतु नव्या नियमामुळे या प्रक्रियेत आणखी एक पायरी डीएनए चाचणी जोडली जाऊ शकते.
काय आहे नवीन नियम?
नवीन प्रस्तावित नियमानुसार, DHS ला अर्जदारांची ओळख निश्चित करण्यासाठी आणि पार्श्वभूमी तपासणीसाठी डीएनएसह सर्व प्रकारचा बायोमेट्रिक डेटा गोळा करण्याचा अधिकार दिला जाईल. या डेटामध्ये चेहऱ्याचे स्कॅन, डोळ्यांचे फोटो, बोटांचे ठसे, आवाजाचे नमुने आणि स्वाक्षऱ्या यांचा समावेश असेल.
हेही वाचा - 'ख्रिश्चनांवरील हल्ले थांबवा नाहीतर परिणाम भोगा...'; अमेरिकेचा नायजेरियाला कठोर इशारा
डीएनए डेटा विशेषतः अर्जदारांचे अनुवांशिक नातेसंबंध पडताळणे, काही इमिग्रेशन फायद्यांशी संबंधित लिंगाचा पुरावा देणे आणि फसवणुकीपासून बचाव करणे या कारणांसाठी वापरला जाईल. DHS च्या मते, बायोमेट्रिक डेटा संकलनामुळे राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल आणि इमिग्रेशन फसवणूक कमी होईल. एजन्सीने म्हटले आहे की, ओळख पडताळणी आणि व्यवस्थापनासाठी बायोमेट्रिक्सचा वापर डीएचएसला तस्करी रोखण्यासाठी, गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणी सुधारण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी मदत करेल.
हेही वाचा - Pakistan Navy Firing Drill: भारताच्या ‘ऑपरेशन त्रिशूल’ दरम्यान पाकिस्तानचा सागरी सराव; सिर क्रीक परिसरात वाढली हालचाल
सध्या या प्रस्तावावर सार्वजनिक अभिप्राय मागविण्यात येत आहेत. अभिप्राय मिळाल्यानंतर हा प्रस्ताव काँग्रेससमोर सादर केला जाईल, आणि मंजुरी मिळाल्यास तो कायदा बनेल. हा नवा नियम लागू झाल्यास, अमेरिकेत काम करू इच्छिणारे सर्व परदेशी नागरिक, वर्क व्हिसा अर्जदार तसेच इतर इमिग्रेशन फायद्यांसाठी अर्ज करणारे लोक यांना डीएनए नमुना देणे अनिवार्य होईल. ट्रम्प सरकारचा हा प्रस्ताव अमेरिकेच्या इमिग्रेशन प्रक्रियेत ऐतिहासिक बदल घडवू शकतो. परंतु, यामुळे गोपनीयतेच्या अधिकारांवर आणि डेटा सुरक्षिततेवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.