Monday, November 17, 2025 12:28:05 AM

OctaFX Ponzi Scam: धक्कादायक! स्पेनमध्ये बसून आरोपीने रचला मोठा सापळा; भारतीय गुंतवणूकदारांकडून लुटले 5,000 कोटी

स्पॅनिश पोलिसांनी 17 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपीला अटक केली. तसेच त्याच्या काही क्रिप्टो मालमत्ता व लक्झरी मालमत्ता जप्त केल्या.

octafx ponzi scam धक्कादायक स्पेनमध्ये बसून आरोपीने रचला मोठा सापळा भारतीय गुंतवणूकदारांकडून लुटले 5000 कोटी

OctaFX Ponzi Scam: स्पेनच्या पोलीस आणि भारतीय तपासयंत्रणांच्या संयुक्त कारवाईत एका आंतरराष्ट्रीय फिनटेक पोंझी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अटक झाल्याची माहिती मिळाली आहे. रशियन नागरिक पावेल प्रोझोरोव्हवर (Pavel Prozorov) आरोप आहेत की, त्याने 2019 ते 2024 दरम्यान एका फॉरेक्स-आधारित ट्रेडिंग संकेतस्थळाद्वारे (ऑक्टाएफएक्सच्या नावाखाली) भारतीय गुंतवणूकदारांना बंपर परताव्याचे आमिष दाखवून सुमारे 5,000 कोटी इतकी रक्कम लुबाडली.  

प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की ही योजना पोंझी तंत्राचा वापर करून राबवण्यात आली. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना खऱ्या पैशातून परतफेड दिसून येत होती, ज्यामुळे इतर विश्वासाने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू लागले. मात्र विश्वास वाढल्यानंतर प्लॅटफॉर्म अचानक बंद पडला आणि मोठ्या प्रमाणात घोटाळा उघडकीस आला. जुलै 2022 ते एप्रिल 2023 या काळात या घोटाळ्यात सर्वात मोठी हानी झाली. तपासानुसार या कालावधीत सुमारे 1,875 कोटींचे नुकसान झाले. ईडीच्या प्राथमिक अंदाजानुसार, एकंदर गुंतवणूकदारांकडून लुटलेली रक्कम सुमारे 5,000 कोटीच्या आसपास आहे.

हेही वाचा - ‘डॉक्टर पतीनं भयंकर कट रचून केली हत्या;’ मुलीच्या आठवणींच्या असह्य दु:खामुळं वडिलांनी तिच्यासाठी बांधलेल्या घराबाबत घेतला 'असा' निर्णय

स्पॅनिश पोलिसांनी 17 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपीला अटक केली. तसेच त्याच्या काही क्रिप्टो मालमत्ता व लक्झरी मालमत्ता जप्त केल्या. त्यामधून सुमारे 2,385 कोटींची क्रिप्टो मालमत्ता हस्तगत केल्याचे तपासकर्त्यांनी सांगितले. आतापर्यंत एकूण सुमारे 2,681 कोटी जप्त करण्यात आली आहेत. भारतातून आणि परदेशातून या प्रकरणाशी संबंधित अनेक कंपन्या व व्यक्तींची नावे समोर आली असून अधिकार्यांनी अनेक आरोपींबाबत गुन्हे नोंदवले आहेत.

हेही वाचा - Bengaluru Crime: अभियांत्रिकी महाविद्यालयातील 21 वर्षीय विद्यार्थी मुलीला वॉशरुममध्ये घेऊन गेला अन्..., पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

दरम्यान, तपासात असेही आढळले आहे की प्लॅटफॉर्मने टियर-2 व टियर-3 शहरांमधील गुंतवणूकदारांना लक्ष्य केले, मोठ्या रिटर्नचे वायदे देऊन लोकांना आकर्षित केले आणि सामाजिक माध्यमे व सेलिब्रिटी-प्रमोशन्सद्वारे विश्वास निर्माण केला. सुरुवातीला पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली. परंतु नंतर विनंतींना नकार दिला जात होता आणि निधी डमी खात्यांमध्ये व परकीय मार्गांनी हलवण्यात आला. सध्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 
 


सम्बन्धित सामग्री