Friday, April 25, 2025 07:54:43 PM

Chinese Naval Jet Crash: सरावादरम्यान चिनी नौदलाचे लढाऊ विमान कोसळले; पहा व्हिडिओ

या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपघातादरम्यान पायलट विमानातून सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाला.

chinese naval jet crash सरावादरम्यान चिनी नौदलाचे लढाऊ विमान कोसळले पहा व्हिडिओ
Chinese Naval Jet Crash
Twitter

Chinese Naval Jet Crash: चीनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शनिवारी चीनमध्ये प्रशिक्षण सरावादरम्यान एक नौदल लढाऊ विमान कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपघातादरम्यान पायलट विमानातून सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाला.

हेही वाचा - Jaguar Fighter Aircraft Crash: पंचकुलामध्ये भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले; पॅराशूटने उडी मारून वैमानिकाने वाचवले प्राण

चीनमधील या अपघातानंतर नौदलाने एक निवेदन जारी केले आहे. नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर्न थिएटर कमांडचे जेट दुपारी हैनानच्या दक्षिणेकडील बेटावरील जिआलाई शहराजवळील एका मोकळ्या जागेत कोसळले.

हेही वाचा - कॅनडामध्ये मोठा अपघात! लँडिंग करताना Delta Airlines चे विमान Toronoto Airport वर कोसळले; 19 प्रवासी जखमी

चिनी नौदलाचे लढाऊ विमान कोसळले; पहा व्हिडिओ - 

अपघाताची चौकशी होणार - 

तथापि, हाँगकाँगस्थित साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, वैमानिक विमानातून यशस्वीरित्या बाहेर पडला. तसेच या अपघातामुळे जमिनीवर कोणतेही नुकसान झाले नाही. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने सांगितले की ते घटनेनंतर अपघाताच्या कारणांची चौकशी करणार आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री