अमेरिका : कधी जिथे श्रीमंती दिसायची, तिथे आता भकास, राख दिसतेय. वणव्यामुळे हजारो एकर जमिनीवरील वृक्ष, वस्ती भस्मसात झालीय. अतिप्रगत गणल्या जाणाऱ्या अमेरिकेत या आगीने अत्यंत महाप्रचंड असं नुकसान झालंय. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजिलिसमध्ये नव वर्षाच्या सुरूवातीला अग्नितांडव सुरू झाले. या आगीने अमेरिकन प्रशासनाला अक्षरक्ष: हादरवून सोडलंय. श्रीमंतीत राहणाऱ्या हजारो लोकांवर आता शिबिरात राहण्याची वेळ आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
अमेरिकेतील अग्नितांडव
लॉस एंजेलिस हे कॅलिफॉर्नियामधील शहर हॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगाचे केंद्र आहे
भीषण आगीमुळे हॉलिवूडवर मोठा परिणाम झालाय
आगीत पॅसिफिक पॅलिसेड्स, पासाडेना, अल्टाडेना आणि हॉलिवूड हिल्स पूर्णतः उद्ध्वस्त
यात अनेक हॉलिवूड कलाकारांची घरे जळाली
हॉलिवूड सेलिब्रिटींचा ३०० कोटी रुपये किमतीचा बंगला जळून खाक
आगीची दाहकता कमी झाल्यावर प्रशासनाकडून आगीच्या नुकसानीची पाहणी
आगीत एक लाख लोकांचे स्थलांतर, दीड हजारांहून अधिक इमारती पूर्णपणे नष्ट
हेही वाचा : Pakistan: भ्रष्टाचाराप्रकरणी इम्रान खानला 14 वर्षांची शिक्षा
अमेरिकेत लागलेल्या या वणव्यामुळे तेथील जीवनमानावर आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने जगभरात ग्लोबल वॉर्मिगबाबत व्यक्त होणाऱ्या भीतीला पुष्टी मिळाली आहे. आपण सर्वांनीच पर्यावरणाचे रक्षण केले नाही तर ही दाहकता आपल्या उंबरठ्यावरही उभी आहे.