Bangladesh General Election 2025: बांगलादेशातून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. अंतरिम नेते मोहम्मद युनूस यांनी शुक्रवारी याबाबत घोषणा केली. त्यांनी सांगितले की, देशात एप्रिल 2026 मध्ये निवडणुका होतील. सध्या बांगलादेशमध्ये काळजीवाहू सरकारचे नेतृत्व 84 वर्षीय नोबेल शांतता पुरस्कार विजेते युनूस यांच्याकडे आहे. शुक्रवारी देशातील नागरिकांना संबोधित करताना त्यांनी बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली.
गेल्या वर्षी बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान निदर्शकांनी पंतप्रधान निवासस्थान ताब्यात घेतले होते. त्यानंतर शेख हसीना यांनी मोठ्या प्रयत्नानंतर निवास सोडलं आणि त्या भारतात आश्रयासाठी आल्या. सध्या शेख हसीना भारतात राहत आहेत. परंतु, याबाबत फक्त भारत सरकार आणि गुप्तचर संस्थेला माहिती आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींना मिळाले G7 शिखर परिषदेचे निमंत्रण! कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला फोन
बांगलादेशातील जनतेने पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले होते. या दरम्यान, निदर्शक आणि लष्करामध्ये हिंसक संघर्ष झाला. असे म्हटले जाते की या निदर्शनादरम्यान देशभरात 300 हून अधिक लोक मारले गेले. शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने देशात अंतरिम सरकार स्थापन केले.
हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांची शी जिनपिंग यांच्याशी फोनवर चर्चा; कोणत्या मुद्द्यांवर झाली खलबत?
दरम्यान, बांगलादेशात मोहम्मद युनूस यांची मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून, मोहम्मद युनूस बांगलादेशाच्या सत्तेची सूत्रे सांभाळत आहेत. तथापि, ख हसीनांचा पक्ष बांगलादेशात होणाऱ्या निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाही. कारण गेल्या महिन्यात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने अवामी लीगवर बंदी घातली आहे. हा निर्णय शेख हसीनांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.