टेक्सास: अमेरिकेतील टेक्सास राज्यात शुक्रवारी पहाटे ग्वाडालुपे नदीला महापूर आला. या महापूरामुळे मोठा विध्वंस झाला असून मृतांची संख्या 13 वरून 51 झाली आहे. या आपत्तीचा सर्वाधिक फटका केर काउंटीला बसला आहे. या भागातच 15 मुलांसह 43 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. याशिवाय, आजूबाजूच्या परिसरातही अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
ग्वाडालुपे नदीची पाण्याची पातळी 26 फूटांनी वाढली -
ग्वाडालुपे नदीची पाण्याची पातळी अवघ्या 45 मिनिटांत 26 फूट वाढली. यामुळे झाडे उन्मळून पडली, वाहने पाण्यात वाहून गेली आणि अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले. तसेच हजारो घरे पाण्यात बुडाली.
हेही वाचा - पंतप्रधान मोदी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित
21 मुली वाहून गेल्या -
हंट परिसरातील ग्वाडालुप नदीच्या काठावर सुरू असलेल्या 'मिस्टिक समर कॅम्प'मध्ये 27 मुली सहभागी झाल्या होत्या. ज्या अजूनही बेपत्ता आहेत. बचाव पथके बेपत्ता मुलींचा शोध घेत आहेत आणि राज्यातील आपत्कालीन सेवा पूर्ण तयारीने काम करत आहेत. पूरक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बचाव कार्य केले जात आहे, ज्यामध्ये हेलिकॉप्टर, बोटी आणि ड्रोनची मदत घेतली जात आहे.
हेही वाचा - रशियाचा युक्रेनवर हवाई हल्ला! कीववर डागली 540 ड्रोन आणि 11 क्षेपणास्त्रे
प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत 850 हून अधिक लोकांना वाचवण्यात मदत पथकाला यश आले आहे. राज्याचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट म्हणाले की, मदत आणि बचाव कार्य चोवीस तास सुरू आहे. या भयानक दुर्घटनेबद्दल स्थानिक रहिवासी प्रशासनावर संतापले आहेत. पूरसारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे.