Fire At Power Station In London
Edited Image
Fire At Power Station In London: लंडनचे हीथ्रो विमानतळ शुक्रवारी अचानक बंद करावे लागले. याचे कारण विमानतळाजवळील एका विद्युत उपकेंद्रात आग लागली होती, ज्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. गुरुवारी रात्री लागलेल्या आगीमुळे विमानतळावरील सर्व सेवांवर परिणाम झाला आणि 1300 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे सुमारे 2 लाख 91 हजार प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
हजारो घरांचा वीजपुरवठा खंडित -
पश्चिम लंडनमधील हेस परिसरात आग लागली, ज्यामुळे 5 हजार हून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. या अपघातानंतर, परिसरातून 150 हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. लंडन अग्निशमन दलाने 70 अग्निशमन दलाच्या मदतीने शुक्रवारी सकाळपर्यंत आग मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणली होती. ब्रिटन पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. ही आग अपघातामुळे लागली की त्यामागे काही कट रचला गेला याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा - MF Husain’s 'Untitled' Painting: एम.एफ. हुसेन यांच्या 'अनटाइटल्ड' पेंटिंगने रचला इतिहास; 'इतक्या' कोटीला विकली गेली एक पेटिंग
हीथ्रो विमानतळ बंद -
दरम्यान, आग लागल्याने हीथ्रो विमानतळावरील सर्व कामकाज शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. या काळात, भारतातून लंडनला जाणारी एअर इंडियाची 6 उड्डाणे देखील रद्द करावी लागली. अनेक मोठ्या विमान कंपन्यांना हीथ्रो विमानतळावरील त्यांच्या उड्डाणे रद्द कराव्या लागल्या. ब्रिटिश एअरवेजला सर्वाधिक फटका बसला. कंपनीची 341 उड्डाणे रद्द करण्यात आली. ज्यामुळे 67,962 प्रवासी अडकून पडले. व्हर्जिन अटलांटिकने 31 उड्डाणे रद्द केली, ज्यामुळे 9,058 प्रवाशांवर परिणाम झाला.
हेही वाचा - World Largest Digital Camera Launched: जगातील सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा लाँच; काय आहे खास? जाणून घ्या
जर्मनीमध्येही झाला होता विमानसेवेवर परिणाम -
काही दिवसांपूर्वी जर्मनीमध्येही अशीच एक समस्या दिसून आली होती. 9 मार्च रोजी विमानतळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे देशभरातील हवाई सेवा ठप्प झाली. या कालावधीत, 13 प्रमुख विमानतळांवर 3400 उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे 5 लाखांहून अधिक प्रवाशांची गैरसोय झाली होती.