Friday, February 13, 2026 09:49:24 AM

Bangladesh Violence On Hindu: बांगलादेशात हिंदूं असुरक्षित; फावड्याने वार करून हिंदू व्यापाऱ्याला संपवलं, 24 तासांत दुसरी घटना

गेल्या 24 तासांतील हिंदू व्यक्तीच्या मृत्यूची ही दुसरी घटना असून, यामुळे स्थानिक हिंदू समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

bangladesh violence on hindu बांगलादेशात हिंदूं असुरक्षित फावड्याने वार करून हिंदू व्यापाऱ्याला संपवलं 24 तासांत दुसरी घटना

Bangladesh Violence On Hindu: शेजारील देश बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजावरील हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. शनिवारी गाझीपूर जिल्ह्यात एका हिंदू व्यापाऱ्याला भररस्त्यात मारहाण करून संपवण्यात आलं. गेल्या 24 तासांतील हिंदू व्यक्तीच्या मृत्यूची ही दुसरी घटना असून, यामुळे स्थानिक हिंदू समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

व्यापाऱ्यावर फावड्याने हल्ला; तीन आरोपी ताब्यात

प्राथमिक माहितीनुसार, मृताचे नाव लिटन चंद्र घोष (वय 55) असून ते 'बैशाखी स्वीटमीट अँड हॉटेल'चे मालक होते. स्थानिक रहिवासी त्यांना 'काली' या नावाने ओळखत असतं. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गाझीपूर जिल्ह्यातील कालीगंज भागातील बोरो नगर रस्त्यावर काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींनी घोष यांना फावड्याने बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आतापर्यंत 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - India America Tarrif War: भारतासाठी अमेरिकेतून आली मोठी आनंदाची बातमी; ट्रम्प यांचा टॅरिफ प्लॅन फसला?

राजबारी जिल्ह्यात हिंदू कामगाराला चिरडलं

या घटनेच्या अवघ्या 24 तास आधी, शुक्रवारी राजबारी जिल्ह्यात रिपन साहा (वय 30) या हिंदू तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रिपन हा 'करीम फिलिंग स्टेशन'मध्ये कामाला होता. एका काळ्या रंगाच्या SUV चालकाने 5,000 टका (सुमारे 3,710 रुपये) किमतीचे इंधन भरले आणि पैसे न देता पळून जाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा रिपनने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चालकाने त्याला गाडीखाली चिरडून संपवलं. 

हेही वाचा - Donald Trump : दुसऱ्याचं तर दुसऱ्याचं.. पण नोबेल मिळालं अन् ट्रम्पचं मनोरथ अखेर पूर्ण झालं! इतिहासात प्रथमच घडला हा विचित्र प्रकार

पोलिसांची कारवाई आणि संशय

राजबारी पोलिसांनी या घटनेतील SUV जप्त केली असून गाडीचा मालक अबुल हाशेम (55) आणि चालक कमाल हुसेन (43) यांना अटक केली आहे. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस प्रमुख खोंडाकर झियाउर रहमान यांनी सांगितले. दरम्यान, रिपन साहा याच्या मृत्यूचा थेट संबंध धार्मिक द्वेषाशी आहे की नाही, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 


सम्बन्धित सामग्री