मुंबई : सध्या देशात एचएमपीव्ही व्हायरसच्या रूग्णाच्या संख्या वाढत आहे. एचएमपीव्ही व्हायरस म्हणजे मानवी मेटापन्यूमोव्हायरस आहे. चीनध्ये या आजाराचे रूग्ण वाढत आहेत. आता भारतात एचएमपीव्हीचे सात रूग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये बंगळुरू, नागपूर, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये या आजाराचे रूग्ण सापडले आहेत.
हेही वाचा : चीनमध्ये पसरलेल्या HMPV चे रुग्ण भारतात
एचएमपीव्ही व्हायरसची उत्पत्ती 2000 च्या दशकाच्या सुरूवातीपासून झाली असून त्याला नव्याने उद्भवलेला विषाणू असे मानणे चुकीचे असल्याची माहिती दिल्लीतील डॉ. नीरज निश्चल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी साधलेल्या संवादात म्हटले आहेत. कोवीड-19 शी याची तुलना करू नका कारण कोरोना हा पूर्णपणे नवीन विषाणू होता आणि आपल्यापैकी कोणाचीही त्याच्याविरूद्ध लढण्याची प्रतिकाशक्ती नव्हती. एचएमपीव्हीचे 2001 पासून वर्णून केले जात आहे. पुराव्याच्या आधारे 1950 च्या उत्तरार्धात हा आजार आढळून आला. वयाच्या 10 व्या वर्षापर्यंत, बहुतेक मुलांमध्ये याविरूद्ध विकसित होता असे डॉ निश्चल यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
कोरोना व्हायरससारखा एचएमपीव्ही तोंडी प्रसारित किंवा श्वासोच्छवासाद्वारे पसरत नाही. त्याऐवजी हा खोकल्याच्या एका थेंबाद्वारे पसरतो. म्हणूनच एचएमपीव्ही कोविड प्रमाणेच प्रसारित होत नाही असे पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बंगळुरूच्या एचसीजी हॉस्पिटलच्या सर्जिकल ऑन्कोलॉजस्ट राव यांनी सांगितले.
एचएमपीव्ही व्हायरस श्वसनाच्या थेंबातून किंवा विषाणूने दूषित झालेल्या पृष्ठभागाच्या संपर्कातून पसरतो. शिंकताना, खोकताना या आजाराचे संक्रमण होऊ शकते.