Al-Hutaib In Yemen, Where It Has Never Rained : येमेनची राजधानी सानाच्या पश्चिमेस असलेले अल-हुतैब गाव हे जगातील एक असे ठिकाण आहे, जिथे आजपर्यंत कधीही पाऊस पडलेला नाही. हे गाव एका उंच टेकडीवर वसलेले आहे, त्यामुळे ढग खाली राहतात आणि येथे पाऊस पडत नाही. जगातील अनेक ठिकाणे त्यांच्या अनोख्या हवामानासाठी ओळखली जातात, परंतु हे गाव त्याच्या कोरड्या हवामानामुळे ओळखले जाते.
जगात अशी अनेक अनोखी ठिकाणे आहेत, जी तेथील विचित्र हवामान आणि नैसर्गिक घटनांसाठी ओळखली जातात. काही ठिकाणी पुराचा धोका असतो, तर काही ठिकाणी इतका पाऊस पडतो की तिथे राहणे कठीण होते. काही ठिकाणी तापमान इतके जास्त असते की तिथे जगणं मुश्कील होतं तर, काही ठिकाणी इतकी थंडी असते, की तिथे काहीच पिकत नाही..
हेही वाचा - अजब-गजब रिवाज: या देशात घरांच्या भिंतींवर लावले जातात पत्नीचे फोटो; मात्र, अद्यापही महिलांना नाही 'हा' अधिकार
पण तुम्ही कधी अशा ठिकाणाबद्दल ऐकले आहे का जिथे आजपर्यंत कधीही पाऊस पडला नाही? हे सुजलाम सुफलाम भारत देशात राहणाऱ्यांना तसं अविश्वसनीय वाटण्यासारखंच आहे. पण खरंच असं ठिकाण जगात अस्तित्वात आहे. येमेनची राजधानी सनाच्या पश्चिमेला असलेले 'अल हुतैब गाव' हे असे एक ठिकाण आहे, जिथे आतापर्यंत कधीही पाऊस पडलेला नाही.
हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 3 हजार 200 मीटर उंचीवर आहे, त्यामुळे येथील हवामान खूपच विचित्र आहे. येथे सकाळी आणि रात्री हाडे गोठवणारी थंडी असते, तर दिवसा प्रचंड उष्णता जाणवते. सकाळच्या थंडीत झोपेतून उठताना लोकांना हुडहुडी भरलेली असते, त्यामुले अंथरूणातून बाहेर येण्याची इच्छाच होत नाही. परंतु, सूर्य उगवताच उष्णता इतकी वाढते की, लोकांची स्थिती दयनीय होते. मात्र, इतक्या विषम हवामानातही, हे गाव एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे. हे अनोखे ठिकाण पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. डोंगरावर वसलेल्या या गावातील खालील दृश्य खूपच आकर्षक आणि मनमोहक दिसते, जे या गावाला आणखी खास बनवते.
या गावाची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते टेकडीच्या माथ्यावर असल्याने, जेव्हा तुम्ही इथे जाता, तेव्हा तुम्हाला स्वर्गात आल्यासारखे वाटते. पण तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की, आजपर्यंत या ठिकाणी पाऊस का पडला नाही?
हेही वाचा - Indian Railway's Beautiful Routes : भारतातले निसर्गसौंदर्यानं नटलेले हे रेल्वे मार्ग तुम्हाला माहीत आहेत का? प्रवासादरम्यान दिसतील नयनरम्य दृश्यं
याचे कारण असे की हे सुंदर गाव एका उंच टेकडीच्या माथ्यावर वसलेले आहे, ज्यामुळे ढग त्याच्या खाली राहतात आणि कधीही गावात पोहोचत नाहीत. ढग सखल भागात जमतात आणि पाऊस पाडतात, परंतु ढग या उंचीवर तयार होत नाहीत, म्हणून आजपर्यंत येथे कधीही पाऊस पडलेला नाही.