IndiGo Issues Advisory: इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे परदेशात जाणाऱ्या भारतीयांना अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत इंडिगो आणि एअर इंडियाने सूचना जारी केल्या आहेत. एअरलाईन्सने लोकांना त्यांच्या फ्लाइट्सची स्थिती तपासत राहण्याचे आवाहन केले आहे. इंडिगोने म्हटले आहे की, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे इराणचे हवाई क्षेत्र वापरले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत काही फ्लाइट्सचा मार्ग बदलण्यात आला आहे. त्यामुळे काही फ्लाइट्सला उशिरा होऊ शकतो.
हेही वाचा- विजय रुपाणीसह भारतातील 'या' मोठ्या व्यक्तींनी गमावला आहे विमान अपघातात आपला जीव
दरम्यान, इंडिगोने परदेशात जाणाऱ्या लोकांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइट्सची स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. इंडिगोने X वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'इराण आणि त्याच्या आसपासच्या भागातील हवाई क्षेत्र अद्याप उपलब्ध नाही. काही विमानांचे मार्ग बदलावे लागू शकतात, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाढू शकतो किंवा उड्डाणाला उशीर होऊ शकतो. विमानतळावर जाण्यापूर्वी आमच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर तुमच्या विमानाची स्थिती तपासण्याची आम्ही शिफारस करतो. आमचे पथक तुम्हाला कोणतीही मदत देण्यासाठी वचनबद्ध आणि उपलब्ध आहेत. प्रवाशांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत अशा सुरक्षित प्रवासाची खात्री करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याने तुमच्या संयमाची आणि समजूतदारपणाची आम्ही प्रशंसा करतो.'
हेही वाचा- मोठी बातमी! एअर इंडियाच्या बोईंग विमानांची चौकशी होणार; अहमदाबाद विमान अपघातानंतर DGCA चा आदेश
एअर इंडियाच्या 16 फ्लाईटवर परिणाम
तथापि, शुक्रवारी एअर इंडियाने एक सल्लागार जारी केला होता आणि म्हटले होते की, इस्रायल-इराण युद्धामुळे 16 विमानांवर परिणाम झाला आहे. या विमानांचा मार्ग बदलण्यात आला असून त्यांना भारतात परत पाठवण्यात आले आहे. सध्या इराण आणि इस्त्राईलमधील तणाव वाढला आहे. शुक्रवारी इस्त्रायलने इराणवर हवाई हल्ला केला. यात अनेकांना मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.