Monday, June 23, 2025 06:31:16 AM

अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडेन यांची माघार

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून जो. बायडेन यांनी माघार घेतली आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडेन यांची माघार

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून जो. बायडेन यांनी माघार घेतली आहे. अध्यक्ष जो. बायडेन यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला. डेमोक्रॅट्सने अद्याप कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केलेले नाही. पण बायडेन यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा देत निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. 

बायडेन ८१ वर्षांचे आहेत. त्यांना विस्मरणाचा त्रास जाणवू लागला आहे. वयामुळे त्यांच्या सक्रियतेवर परिणाम झाला आहे. याच कारणामुळे पक्षातून त्यांना उमेदवारीसाठी अपेक्षित पाठिंबा नव्हता. वास्तवाची जाणीव होताच बायडेन यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडत कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला. 


सम्बन्धित सामग्री