Thursday, September 12, 2024 11:18:29 AM

Maria Branyas
जगातील सर्वात वयोवृद्ध आजींनी घेतला अखेरचा श्वास

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती स्पेनच्या मारिया ब्रान्यास यांनी वयाच्या ११७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

जगातील सर्वात वयोवृद्ध आजींनी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती स्पेनच्या मारिया ब्रान्यास यांनी वयाच्या ११७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे आयुष्यात कधीही त्या इस्पितळात गेल्या नाहीत. कोविड झाला होता त्यातूनही त्या बऱ्या झाल्या होत्या. त्यांचा अंतही त्यांच्या इच्छेप्रमाणे झाला. झोपेत असताना, शांतपणे आणि वेदनारहित. खरंच त्यांना भाग्यवान म्हटले पाहिजे. 
शिस्त, शांतता, कुटुंब आणि मित्रांशी चांगले संबंध, निसर्गाशी जवळीक, भावनिक स्थैर्य, चिंता नसणे, पश्चाताप नसणे, भरपूर सकारात्मकता आणि विषारी लोकांपासून दूर राहणे, हे माझ्या दिर्घायुष्याचे रहस्य आहे असे त्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसशी बोलताना म्हणाल्या होत्या. या उमद्या स्वभावाच्या आजीबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या मृत्यूनंतर आता ११६ वर्षांच्या जपानच्या टोमिको इत्सुका या जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती बनल्या आहेत.


सम्बन्धित सामग्री