बीजिंग: जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सुरू असलेल्या तणावादरम्यान, पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीनमध्ये एक मोठा विनाशकारी स्फोट झाला आहे. या भयानक स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा अद्याप कळलेला नसला तरी, सुमारे दीड ते दोन डझन लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. रशियन मीडियाच्या वृत्तानुसार, बुधवारी चीनच्या शांक्सी प्रांतातील एका निवासी संकुलात हा स्फोट झाला. हा हल्ला कोणी केला आणि कसा झाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
स्फोटात किमान 17 जण जखमी -
एपी न्यूजच्या वृत्तानुसार, या स्फोटात किमान 17 जण जखमी झाले आहेत. यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून तिघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. शांक्सी प्रांताची राजधानी असलेल्या तैयुआनमधील शियाओडियन जिल्ह्यातील बेयिंग परिसरात स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजता हा स्फोट झाला. स्फोटामुळे लागलेली आग विझवण्यात आली आहे, असे सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने वृत्त दिले आहे.
हेही वाचा - China Restaurant Fire: चीनमधील लिओनिंग येथील रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; 22 जणांचा मृत्यू
दरम्यान, हा स्फोट कोणी केला हे अद्याप समजू शकलेले नाही. या स्फोटाबाबत चीनकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. घटनेची चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचाव कर्मचारी बाधित इमारतीत घरोघरी सुरक्षा तपासणी करत आहेत आणि स्फोटाचे कारण तपासले जात आहे.
हेही वाचा - भारतानंतर आता 'या' देशात दहशतवादी हल्ला! 2 बॉम्बस्फोटात किमान 26 जणांचा मृत्यू
तथापि, मंगळवारी चीनमधील लिओनिंग प्रांतातील लिओयांग शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली होती. यामध्ये 22 जणांचा वेदनादायक मृत्यू झाला होता.