Thursday, September 12, 2024 11:00:38 AM

Nepal
महाराष्ट्रातील भाविकांचा नेपाळ मधील अपघातात मृत्यू

नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळून भीषण दुर्घटना घडली यात १६ प्रवासी ठार झाले असल्याची माहिती समोर येतेय.

महाराष्ट्रातील भाविकांचा नेपाळ मधील अपघातात मृत्यू

काठमांडू : नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळून भीषण दुर्घटना घडली यात १६ प्रवासी ठार झाले असल्याची माहिती समोर येतेय.... ४० प्रवासी प्रवास करत असलेली बस तानाहून जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत कोसळली आहे. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील जळगावातील जिल्ह्यातील आहेत....याच संदर्भातला अधिक तपशील पाहुयात

  1. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावातून १०४ जणं दोन दिवसांपूर्वी नेपाळ दौऱ्यावर
  2. हे १०४ जणं एकूण तीन बसने प्रवास करत होते
  3. त्यांनी पहिले दोन दिवस पोखराला भेट दिली.
  4. हे सर्व जण शुक्रवारी काठमांडूसाठी रवाना झाले.
  5. या तीन बसपैकी एक बस मार्स्यांगडी नदीत दुर्घटनाग्रस्त झाली. 
  6. बसमध्ये बहुसंख्य प्रवासी हे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर येतेय पाहुयात

  1. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
  2. मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अनिल पाटील स्थानिक यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहेत.
  3. जळगावचे जिल्हाधिकारी नेपाळ सीमेवर असलेल्या महाराजगंज जिल्हाधिकार्‍यांच्या संपर्कात आहेत.
  4. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षकही नेपाळ सीमेवर जाणार आहेत. 
  5. यात्रेकरूंचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्यात. 
           

सम्बन्धित सामग्री