Sunday, November 16, 2025 05:52:40 PM

Nobel Prize 2025: रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर! सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर याघी यांना मिळाला प्रतिष्ठित सन्मान

सुसुमु कितागावा (जपान), रिचर्ड रॉबसन (ऑस्ट्रेलिया) आणि ओमर एम. याघी (अमेरिका) या तिघा वैज्ञानिकांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2025 प्रदान करण्यात आले आहे.

nobel prize 2025 रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर सुसुमु कितागावा रिचर्ड रॉबसन आणि ओमर याघी यांना मिळाला प्रतिष्ठित सन्मान

Nobel Prize 2025: भौतिकशास्त्र आणि वैद्यकशास्त्रातील नोबेल विजेते जाहीर झाल्यानंतर आता रसायनशास्त्राच्या क्षेत्रातील जगातील सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे. सुसुमु कितागावा (जपान), रिचर्ड रॉबसन (ऑस्ट्रेलिया) आणि ओमर एम. याघी (अमेरिका) या तिघा वैज्ञानिकांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2025 प्रदान करण्यात आले आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस हान्स एलेग्रेन यांनी बुधवारी या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा केली. तिघा वैज्ञानिकांना हा सन्मान 'मेटल-ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स' (MOFs) अर्थात धातू-सेंद्रिय चौकटींच्या विकासासाठी दिलेल्या योगदानासाठी देण्यात आला आहे.

काय आहे MOFs?

MOFs म्हणजे धातू आणि सेंद्रिय संयुगांनी तयार झालेली जाळीसदृश संरचना, जी अतिशय हलकी, छिद्रयुक्त आणि गॅस साठवण्यासाठी उपयुक्त असते. या पदार्थांचा वापर कार्बन डायऑक्साइड शोषण, स्वच्छ ऊर्जा साठवण, औषध वाहतूक आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. या संशोधनाने नवीन टिकाऊ रसायनशास्त्राचा पाया घालण्यास मदत केली असून भविष्यातील ग्रीन टेक्नॉलॉजी आणि क्लायमेट सोल्यूशन्स विकसित करण्यास नवे दालन खुले केले आहे.

हेही वाचा - Mumbai OneTicket: पंतप्रधान मोदींनी लाँच केले ‘मुंबई वनटिकट’ अॅप! आता मुंबईत बस, ट्रेन आणि मेट्रोने प्रवास करणे सोपे होणार

रसायनशास्त्रानंतर गुरुवारी साहित्य क्षेत्रातील विजेत्यांची घोषणा होणार आहे, तर शुक्रवारी शांततेचा नोबेल आणि सोमवारी अर्थशास्त्र पुरस्कार जाहीर केला जाईल. सर्व पुरस्कारांचा वितरण समारंभ 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोममध्ये, नोबेल पुरस्कार संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी होणार आहे. अल्फ्रेड नोबेल 1895 मध्ये आपल्या संपत्तीचा मोठा भाग मानवतेच्या प्रगतीसाठी विज्ञान, साहित्य आणि शांततेच्या कार्यात देण्याची घोषणा केली होती.

हेही वाचा  - IPS Puran Kumar Suicide : काय आहे IPS पूरन कुमार यांच्या सुइसाईड नोटमध्ये? पत्नीही आहे वरिष्ठ IAS अधिकारी

मागील वर्षीचे रसायनशास्त्रातील विजेते
दरम्यान, 2014 मध्ये हा सन्मान डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर या वैज्ञानिकांना मिळाला होता. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जीवनाला आधार देणाऱ्या प्रथिनांचे डीकोडिंग आणि डिझाइन करण्याचे कार्य केले होते.


सम्बन्धित सामग्री