Visa-Free Entry for Indian Tourists in Philippines : भारतीय पर्यटकांनो, तुम्हाला परदेशात फिरण्याची आवड असेल आणि तुम्ही फिरण्यासाठी पर्याय शोधत असाल, एका देशाची ऑफर खास तुमच्यासाठी आहे. तसं पाहिलं तर, भटकंतीची आवड प्रत्येकाची वेगळी असते. काहींना मित्र-परिवारासोबत जायला आवडतं, तर काहींना एकट्यानेच प्रवासाला निघायला आवडतं. तुम्हालाही अशी आवड असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
व्हिसा-मुक्त प्रवेश आणि थेट कनेक्टिव्हिटी
भारतीय नागरिकांना आता फिलिपिन्समध्ये (Philippines) 14 दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय (Visa-free Entry) प्रवेश करण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच, एअर इंडियाने (Air India) दिल्ली-मनीला थेट विमानसेवा (Direct Flight Service) पुन्हा सुरू केली आहे. तब्बल दहा वर्षांनंतरची ही पहिली थेट उड्डाणे आहेत. या नवीन सुविधांमुळे भारतीय प्रवाशांसाठी फिलिपिन्स आता एक सोयीस्कर आणि आकर्षक पर्यटनस्थळ बनले आहे.
हेही वाचा - Longest Train Journey: रेल्वेने Explore करा 13 देश; अवघ्या 21 दिवसांत अनुभवता येईल जगातील सर्वात लांब प्रवास
पर्यटन आणि व्यवसायाला चालना
फिलिपिन्सचे भारतातील राजदूत जोसेल एफ. इग्रासिओ म्हणाले, "व्हिसा-मुक्त प्रवेश आणि थेट उड्डाणांमुळे भारत आणि फिलिपिन्समधील पर्यटन आणि व्यवसायातील कनेक्टिव्हिटी अधिक दृढ होईल. आता प्रवास अधिक सोपा आणि जलद झाला आहे, त्यामुळे अधिकाधिक भारतीय प्रवाशी फिलिपिन्सकडे प्रवास करतील, अशी आमची अपेक्षा आहे."
व्हिसा धोरणानंतर ऑनलाईन सर्चमध्ये मोठी वाढ
जून 2025 पासून भारतीयांना 14 दिवसांसाठी व्हिसाशिवाय फिलिपिन्समध्ये मुक्काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या ऑनलाईन सर्चमध्येही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. ‘अॅटलिस’ (Atlys) या व्हिसा प्रक्रिया प्लॅटफॉर्मनुसार, व्हिसा-मुक्त धोरण जाहीर झाल्यानंतर भारतातून फिलिपिन्ससाठी होणाऱ्या प्रवास शोधांमध्ये 28% वाढ नोंदवली गेली आहे.
आकर्षणाची कारणे: फिलिपिन्समध्ये असलेले सूर्यप्रकाशित समुद्रकिनारे (Beaches) आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा (Rich Cultural Heritage) भारतीय पर्यटकांना आकर्षित करत आहे. याशिवाय, सुलभ व्हिसा धोरण आणि थेट उड्डाणांमुळे प्रवास अधिक सोपा झाला आहे.
हेही वाचा - Unexplored Places: जगातील 'या' 5 रहस्यमय जागा आजही अनभिज्ञ; भारतातील एक बेटही धोक्याचं प्रतीक