Thursday, September 12, 2024 12:05:44 PM

Modi
पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. मोदी युद्धाने होरपळलेल्या युक्रेनला गेले आहेत. विशेष म्हणजे मोदी विमानाऐवजी ट्रेनने युक्रेनला गेले आहेत.

पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा

कीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. मोदी युद्धाने होरपळलेल्या युक्रेनला गेले आहेत. विशेष म्हणजे मोदी विमानाऐवजी ट्रेनने युक्रेनला गेले आहेत. तब्बल दहा तासांचा प्रवास करून मोदी युक्रेनला गेले. जागतिक नेते असूनही मोदी युक्रेनला विमानाऐवजी ट्रेनने दहा तास प्रवास करत गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विमानाऐवजी ट्रेनने जाण्याचा आणि अधिक वेळ घालवण्यामागे काय कारण आहे? यामागे काही डिप्लोमसी आहे का? अशी चर्चाही सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले आहेत. त्यांनी पोलंड ते कीव असा ट्रेनने प्रवास केला. तब्बल दहा तास त्यांनी प्रवास केला. यूक्रेनच्या युद्धानंतर मोदी हे पहिल्यांदा युक्रेनमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी यूक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मोदींनी ‘ट्रेन फोर्स वन’ या अत्यंत स्पेशल ट्रेनने प्रवास केला. या ट्रेनमध्ये व्हीआयपी प्रवाशांसाठी सुरक्षेचे जबदरस्त उपाय केले आहेत.

ट्रेनमध्ये प्रचंड सुरक्षा

कोणत्याही संकटाला सामना देण्यासाठी ही ट्रेन फोर्स वन तयार करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये टेहळणी यंत्रणा आणि दूरसंचार नेटवर्कची व्यवस्था आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांची एक वेगळी टीम या ट्रेनमध्ये आहे. त्यातून बाहेरच्या परिस्थितीवर लक्ष ठेवलं जातं.

या नेत्यांची पहिली भेट

२४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशिया आणि यूक्रेनच्या दरम्यान युद्ध सुरू झालं. त्यानंतर पोलंड, चेक गणराज्य आणि स्लोवेनिया या देशाच्या पंतप्रधानांनी सर्वात आधी यूक्रेनचा दौरा केला होता. त्यानंतर वैश्विक नेत्यांनीही म्हणजे अमेरिका, फ्रान्स, इटली, कॅनडा, जर्मनी आणि ब्रिटनच्या नेत्यांनीही यूक्रेनचा दौरा केला होता. विशेष म्हणजे या सर्वांनी याच ट्रेनने कीवचा दौरा केला होता.

‘आयर्न डिप्लोमेसी’

वैश्विक नेत्यांनी ट्रेनद्वारे पोलंडहून यूक्रेनला जाणं हा एक मुत्सद्देगिरीचा भाग असल्याचं मानलं जातं. या मुत्सद्देगिरीला ‘आयर्न डिप्लोमेसी’ असं नाव देण्यात आलं आहे. युक्रेनी रेल्वेचे सीईओ ओलेक्सांद्र कामिशिन यांनी हा शब्द दिला आहे. या डिप्लोमसीनुसार जगातील नेते युद्ध आणि हवाई मार्ग बंद असल्याकडे कानाडोळा करून कीव येथे जाण्यासाठी रस्ते मार्गाने जाणं पसंत करतात. तसेच संघर्षाच्या काळात युक्रेनचं समर्थन करतात.

म्हणून ट्रेनने प्रवास

युद्धाच्या काळात कोणताही नेता विमानाने प्रवास करत नाही. तसेच त्या काळात त्या देशातील विमानसेवा बंदच ठेवली जाते. कारण विमानावर रॉकेट हल्ला किंवा क्षेपणास्त्राचा मारा होऊ शकतो. त्यामुळे विमान हवेतच दुर्घटनाग्रस्त होऊ शकतं. या पार्श्वभूमीवर अनेक नेते रस्ते मार्गे प्रवास करणंच सोयीस्कर मानतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच विमानाने प्रवास करतात. पण युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, त्यामुळे त्यांना ट्रेनमधून प्रवास करावा लागला आहे. युद्धामुळे युक्रेनचे विमानतळ बंद आहेत. रस्त्यावरून प्रवास करणं धोकादायक आहे. त्यामुळे जगातील कोणताही नेता अशा काळात विमानाऐवजी ट्रेननेच प्रवास करण्याला प्राधान्य देत असतो.

युक्रेन आणि रशिया युद्धानंतर अनेक नेत्यांनी युक्रेनला रेल्वे मार्गानेच जाणं पसंत केलं आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी यूक्रेनमध्ये विमान, कार, बस आणि ट्रेनची सेवा होती. परंतु आता फक्त ट्रेन आणि कार चालत आहेत. विमान सेवा नाहीये. आम्ही एक बलाढ्य राष्ट्र आहोत. त्यामुळे कीवहून पश्चिम आणि दक्षिण किंवा पूर्व युक्रेनला जाताना स्लीपर ट्रेननेच जातो. तुम्ही उशिरा संध्याकाळी ट्रेनमध्ये बसता, संपूर्ण रात्रभर प्रवास करता आणि सकाळी तुमच्या इच्छित स्थळी पोहोचता. त्यामुळे तुमचा वेळ वाया जात नाही. युद्धापूर्वी रेल्वे आरामदायक होती. आता पण आरामदायक आणि सुरक्षितही आहे. त्यामुळेच ट्रेन महत्त्वाच्या आहेत, असं कामिशिन यांनी सांगितलं. युद्धाच्या काळात जर रेल्वे लाईनचं नुकसान झालं तर त्याची तात्काळ दुरुस्ती करता येते. दक्षिणेकडील शहर खेरसॉनमध्ये संघर्षानंतर आठ दिवसानंतर लगेच ट्रेन सुरू झाल्या होत्या.

पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा
मोदी - झेलेन्स्की यांची ३ तास चर्चा
मॅरिंस्की प्रासादात झाली चर्चा
झेलेन्स्कींना मोदींनी दिले भारत भेटीचे निमंत्रण

मोदींनी युक्रेनच्या राष्ट्रीय संग्रहालयाला दिली भेट
युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना वाहिली श्रद्धांजली 

तेल खरेदी - विक्रीचे व्यवहार हा आर्थिक विषय, 
तेलाच्या व्यवहारामध्ये कोणतेही राजकारण नाही
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे वक्तव्य


सम्बन्धित सामग्री