Wednesday, December 11, 2024 12:08:40 PM

Narendra Modi
मोदींचे नायजेरियात मराठमोळे स्वागत

नायजेरियात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत झाले.

मोदींचे नायजेरियात मराठमोळे स्वागत

अबुजा : पंतप्रधान मोदी विविध देशांच्या दौऱ्यासाठी दोन दिवस भारताबाहेर आहेत. या दौऱ्याचा भाग म्हणून ते नायजेरियाची राजधानी असलेल्या अबुजा शहरात आहेत. नायजेरियात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत झाले. तिथे राहणाऱ्या मराठी समुदायाने मराठमोळ्या पद्धतीने मोदींचे स्वागत केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. या निर्णयासाठी नायजेरियातील मराठी समुदायाने पंतप्रधान मोदींचे आभार मानले. याप्रसंगी महाराष्ट्रातील पारंपरिक लोकनृत्य असलेली लावणी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर सादर करण्यात आली. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo