रोहन कदम, प्रतिनिधी, पुणे: भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीत इस्राइल, अमेरिका, जापान, रशिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांकडून भारताला पाठिंबा मिळत आहे. मात्र अशा स्थितीत भारत-पाकिस्तान युद्धात तुर्की पाकिस्तानला खुलेआमपणे पाठिंबा देत असल्यामुळे भारतीय आक्रमक आहेत. यामुळे, भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदांवर 'बॅन तुर्की' अशी घोषणा करून बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे, तुर्की सफरचंद भारतीय बाजारातून गायब झाले आहेत. इराणमधून येणाऱ्या सफरचंदाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. घाऊक बाजारात 10 किलो सफरचंदावर 200 ते 300 रुपये प्रति किलो, तर किरकोळ बाजारात प्रति किलो 20 ते 30 रुपये दराने वाढ झाली आहे.
जगभरातील विविध देशांकडून भारताला पाठिंबा मिळत असताना तुर्कीने भारताला पाठिंबा न देता पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदावर बहिष्कार घातला आहे. इराणचा हंगाम शेवटच्या टप्प्यावर असताना तुर्की सफरचंदाचा हंगाम चांगला चालतो. काहींच्या मते, 'इतर देशांतील सफरचंदांपेक्षा तुर्की सफरचंद परवडणारा आहे.' यावर्षी उत्पादन कमी असले तरी भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी तुर्कीकडून खरेदी बंद केली आहे आणि देशासाठी तुर्कीकडून खरेदी टाळली आहे.
हेही वाचा: देशभरातील 32 विमानतळं वाहतुकीसाठी खुली
इतर देशांतील आणि तुर्की देशातील सफरचंदांतील फरक:
1. सामान्य देशांतील सफरचंदे (उदा. अमेरिका, फ्रान्स, चीन, भारत) थंड हवामानात तयार होतात. त्यामुळे त्यांचा आकार मोठा, रसाळ आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये असतो, जसे की हिरवट, गडद लाल.
तुर्कीमधील सफरचंद उष्ण-समशीतोष्ण हवामानात पिकवले जातात. ते साधारणपणे मध्यम आकाराचे, गोड चविचे आणि हलक्या रंगाचे (बहुतेक लालसर हिरवे) असतात.
2. सामान्य देशांतील सफरचंदे गोडसर, थोडीशी आंबटसर चव असलेली आणि कुरकुरीत असतात. तुर्कीमधील सफरचंदे इतर देशांच्या तुलनेत अधिक गोडसर, मऊसर पोत असलेली आणि रसदार असतात.