Sunday, November 16, 2025 06:19:07 PM

Poseidon Nuclear Drone: रशियाची आण्विक ताकद पुन्हा सिद्ध! ‘पोसायडॉन न्यूक्लियर ड्रोन’ची यशस्वी चाचणी

हा ड्रोन इतका शक्तिशाली आहे की त्याची विनाशक क्षमता रशियाच्या 'सरमत इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल' पेक्षाही अनेक पटींनी जास्त असल्याचा दावा पुतिन यांनी केला आहे.

poseidon nuclear drone रशियाची आण्विक ताकद पुन्हा सिद्ध ‘पोसायडॉन न्यूक्लियर ड्रोन’ची यशस्वी चाचणी

Poseidon Nuclear Drone: रशियाने पुन्हा एकदा जगभरात खळबळ उडवली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी जाहीर केले की, रशियाने जगातील सर्वात धोकादायक सागरी अण्वस्त्र प्रणालींपैकी एक 'पोसायडॉन न्यूक्लियर ड्रोन'ची यशस्वी चाचणी केली आहे. हा ड्रोन इतका शक्तिशाली आहे की त्याची विनाशक क्षमता रशियाच्या 'सरमत इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल' पेक्षाही अनेक पटींनी जास्त असल्याचा दावा पुतिन यांनी केला आहे. पुतिन यांनी सांगितले की, 'पोसायडॉन' ची तांत्रिक क्षमता आणि शक्ती इतकी जबरदस्त आहे की सध्या जगात कोणतेही राष्ट्र त्याची बरोबरी करू शकत नाही. हा ड्रोन अणुऊर्जेवर चालतो आणि पाण्याखाली हजारो मीटर खोलीवर कार्य करू शकतो.

हेही वाचा - Kilauea Volcano : हवाईमध्ये किलाउआ ज्वालामुखीचा 200 वर्षांत चौथ्यांदा उद्रेक! 'दैत्याच्या शिंगांसारखे' 1500 फूट उंच लाव्हाचे दोन फव्वारे

अणु त्सुनामी निर्माण करणारा डूम्सडे ड्रोन

रशियन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, पोसायडॉन हे स्वायत्त पाण्याखालील शस्त्र आहे, ज्याची रेंज 10,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. हे बेल्गोरोड पाणबुडीतून सोडले जाते आणि किनारपट्टीवरील शहरांवर किरणोत्सर्गी त्सुनामी निर्माण करून संपूर्ण प्रदेश वर्षानुवर्षे निर्जन करू शकते. नाटोने या शस्त्राला “स्टेटस-6” असे नाव दिले आहे. या ड्रोनमध्ये असलेली 100 मेगाटन क्षमता हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा तब्बल 6,600 पट जास्त शक्तिशाली असल्याचे रशियन सूत्रांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Donald Trump: भारतासोबत व्यापार कराराचे ट्रम्प यांनी दिले संकेत; पंतप्रधानांचे कौतुक करत म्हणाले, 'मोदी सर्वात आकर्षक...

'पोसायडॉन' ची तांत्रिक वैशिष्ट्ये  

अणुऊर्जेवर चालणारा सागरी ड्रोन
10,000 किमीपेक्षा जास्त रेंज
1,000 मीटरपेक्षा खोल पाण्यातही कार्यक्षम
कोणत्याही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला चकवा देण्याची क्षमता
100 मेगाटनपर्यंत अणुशक्ती वाहून नेऊ शकतो

जागतिक समुदायात चिंता

रशियाच्या या चाचणीमुळे जगभरात तणाव वाढला आहे. अमेरिका आणि नाटो देशांनी या हालचालीकडे ‘धोकादायक संकेत’ म्हणून पाहिले आहे. तज्ञांच्या मते, ही चाचणी रशियाच्या तांत्रिक व लष्करी वर्चस्वाचा स्पष्ट संदेश आहे. युक्रेनशी सुरू असलेल्या संघर्षाच्या काळात रशियाने गेल्या आठवड्यात “बुरेव्हेस्टनिक न्यूक्लियर क्रूझ मिसाइल” ची चाचणी केली होती, आणि आता “पोसायडॉन”च्या यशस्वी चाचणीने रशिया आपली आण्विक ताकद जगासमोर पुन्हा दाखवत आहे.
 


सम्बन्धित सामग्री