Friday, May 16, 2025 01:28:05 PM

'उत्तर प्रदेश आणि दिल्लीत 26/11 सारख्या हल्ल्यांची योजना होती'; तहव्वुर राणाचा चौकशीत मोठा खुलासा

एनआयएचे उद्दिष्ट या दहशतवादी कटाच्या तळाशी जाणे आहे कारण एजन्सीला संशय आहे की, राणाने मुंबई व्यतिरिक्त भारतातील इतर शहरांमध्ये मोठे हल्ले करण्याची योजना आखली होती.

उत्तर प्रदेश आणि दिल्लीत 2611 सारख्या हल्ल्यांची योजना होती तहव्वुर राणाचा चौकशीत मोठा खुलासा
Tahawwur Rana
Edited Image

नवी दिल्ली: अमेरिकेतून प्रत्यार्पण केल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला दिल्लीतील मुख्यालयात आणल्यानंतर त्याची चौकशी सुरू केली आहे. प्रथम अधिकाऱ्यांनी एनआयएचे डीजी सदानंद दाते यांच्याशी बैठक घेतली. त्यानंतर चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बैठकीला 12 अधिकारी उपस्थित होते. माध्यमांच्या वृत्तांनुसार, पहिल्या दिवशी तीन तास चौकशी झाली, परंतु एजन्सीचे म्हणणे आहे की राणा पूर्णपणे सहकार्य करत नाही. एनआयएचे उद्दिष्ट या दहशतवादी कटाच्या तळाशी जाणे आहे कारण एजन्सीला संशय आहे की, राणाने मुंबई व्यतिरिक्त भारतातील इतर शहरांमध्ये मोठे हल्ले करण्याची योजना आखली होती. 

NIA राणाला महत्त्वाच्या ठिकाणी घेऊन जाणार - 

एनआयए आता तहव्वुर राणाला हापूर, आग्रा, दिल्ली, कोची, अहमदाबाद आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये घेऊन जाऊ शकते, जिथे तो 2008 मध्ये झालेल्या हल्ल्यांपूर्वी त्याची पत्नी समराज राणा अख्तरसोबत गेला होता. राणाच्या चौकशीसाठी, एनआयएने 50 हून अधिक प्रश्नांची एक लांबलचक यादी तयार केली आहे, ज्याच्या आधारे चौकशी केली जात आहे. याद्वारे, एनआयए मुंबई हल्ल्याशी संबंधित खुलासे उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. या हल्ल्यात राणा आणि डेव्हिड कोलमन हेडलीची काय भूमिका होती हे शोधण्याचा प्रयत्न NIA करत आहे. 

हेही वाचा - Tahawwur Rana NIA Custody: तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी

राणाचे ISI आणि लष्कर-ए-तोयबाशी संबंध - 

दरम्यान, एनआयएच्या तपासात असे समोर आले आहे की राणाचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) शीही संबंध होते. तो 26/11 चा मुख्य सूत्रधार डेव्हिड हेडलीच्या जवळचा होता. त्याच्यासोबत मिळून त्यांनी हा भयानक हल्ला घडवून आणण्याचा कट रचला ज्यामध्ये 166 लोकांचा मृत्यू झाला. तसेच 238 हून अधिक लोक जखमी झाले.

हेही वाचा - 'भारत आणि अमेरिका दहशतवादाविरुद्ध एकत्र'; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केले निवेदन

पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन उद्योगपती राणाला 16 वर्षांनी अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे. त्याला दिल्लीतील एनआयए मुख्यालयात ठेवण्यात आले आहे, जिथे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि देशाची गुप्तचर संस्था आयएसआयकडून राणाला कोणत्या सूचना मिळाल्या होत्या. पाकिस्तानमध्ये तेहव्वुरचा हँडलर कोण होता? हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न तपास अधिकारी करत आहे. 
 


सम्बन्धित सामग्री