Smoking प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
पॅरिस: सध्याच्या तरुण पिढीमध्ये धूम्रपान करण्याची सवय वाढताना दिसत आहे. धूम्रपान केल्याने भविष्यात मोठ्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हा धोका ओळखून फ्रान्सने एक मोठे पाऊल उचलत उद्याने, शाळा, समुद्रकिनारे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर बंदी घातली आहे. तसेच हा नियम मोडणाऱ्याला शिक्षा देखील दिली जाईल. धूम्रपान बंदीची माहिती देताना फ्रान्सच्या आरोग्य आणि कुटुंब मंत्री कॅथरीन वॉट्रिन म्हणाल्या की, फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी जिथे मुले येत-जात राहतात तिथे धूम्रपान करण्यास बंदी आहे.
हेही वाचा - 'हा' आहे जगातील सर्वात लहान देश; तिथे पर्यटक 2 तासांपेक्षा जास्त काळ राहूच शकत नाहीत
धूम्रपान केल्यास शिक्षेची तरतूद -
धूम्रपानावरील बंदी 1 जुलैपासून लागू होईल. बंदी लागू झाल्यानंतर, समुद्रकिनारे, उद्याने, शाळांबाहेरील, बस स्टॉप आणि क्रीडा स्थळांवर धूम्रपान केल्यास शिक्षेची तरतूद असेल. तथापि, कॅफे आणि बारच्या बाहेरील भागात धूम्रपान करण्याचे स्वातंत्र्य कायम राहील.
हेही वाचा - 'पाकिस्तान मूलभूत हक्कांशी तडजोड करणार नाही...'; असीम मुनीर यांचा सिंधू करारावरून भारताला इशारा
नियमाचे उल्लंघन झाल्यास होणार कारवाई -
फ्रान्सच्या स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना कॅथरीन वॉट्रिन यांनी सांगितले की, 'मुलांच्या आरोग्यासाठी धूम्रपान करण्याचे स्वातंत्र्य संपले पाहिजे. धूम्रपान बंदी नियमाचे उल्लंघन करणाऱ्याकडून 153 डॉलर (रु. 13,000) दंड आकारला जाईल. तथापि, फ्रान्सच्या आरोग्य आणि कुटुंब मंत्री कॅथरीन वॉट्रिन यांनी स्पष्ट केले आहे की, धूम्रपान बंदीमध्ये इलेक्ट्रिक सिगारेटचा समावेश नाही.