चीन: चीनने अण्वस्त्र क्षेत्रात केलेल्या नव्या प्रयोगामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच 'ट्रिपल-न्यूक्लियर स्ट्राईक' हा घातक प्रयोग यशस्वीरीत्या करून दाखवला आहे. या प्रयोगामुळे, अण्वस्त्रांची विध्वंसक क्षमता तिप्पट वाढणार असा दावा करण्यात आला आहे.
हा प्रयोग नैनजिंगमधील आर्मी इंजिनियरिंग विद्यापीठातील शास्त्रांज्ञांनी लॅबमध्ये केला आहे. Explosion and Shock Waves या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये याबाबतचा सविस्तर आहवाल पब्लिश झाला आहे. संशोधकांनी सांगितलं की, एकाच ठिकाणी जर एकाचवेळी तीन छोटे अणुहल्ले केले, तर त्याचा परिणाम किती भयानक होईल, हे समजून घेण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. त्यासाठी व्हॅक्यूम चेंबर आणि हाय-प्रेशर गॅस गन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
हेही वाचा: Canada PM Mark Karni : अमेरिकेच्या H-1B व्हिसाची किंमत वाढल्यानंतर कॅनडाच्या पंतप्रधानांची मोठी घोषणा; म्हणाले, '...आम्ही त्यांचे स्वागत करणार'
या प्रयोगाने काही मिलिसेकंदात मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवून आणण्याची क्षमता दाखवून दिली आहे. अण्वस्त्राचा स्फोट होण्यासाठी 0.8 मिलिसेकंद लागतात. मात्र, जर सलग तीन स्फोट झाले तर किती विनाशकारी नुकसान होईल, हे सांगणे कठीण होईल. याचा अर्थ असा की, एकाच अण्वस्त्र हल्ल्यामुळे जितकं नुकसान होतं, त्याच्या तिप्पट नुकसान आता एका झटक्यात होऊ शकतो.
विशेष म्हणजे, असं सांगितलं जात आहे की, चीनने हे तंत्रज्ञान खास बंकर नष्ट करण्यासाठी विकसित केलं आहे. मात्र, चीनच्या या प्रयोगामुळे अमेरिकेसह जगभरात चिंता वाढली आहे. अण्वस्त्रांवर नियंत्रण आणण्यासाठी आतापर्यंत अमेरिकेने अनेक प्रयत्न केले. मात्र, चीनच्या या घातक पयोगामुळे जागतिक सुरक्षेला नवा धोका निर्माण झाला आहे.