Monday, February 10, 2025 07:15:39 PM

Trump-Gaza-Plan
अमेरिका करणार 'गाझा'वर कब्जा: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

इस्रायल-हमास युद्धबंदीनंतर ट्रम्प-नेतन्याहू यांची भेट

अमेरिका करणार गाझावर कब्जा डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. गाझा पट्टीवर अमेरिका कब्जा करणार असून, तिथे विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. इस्रायल-हमास युद्धबंदीनंतर पहिल्यांदाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. त्यानंतर ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत ही मोठी घोषणा केली.

ट्रम्प म्हणाले, "गाझा इथं फिलिस्तिनियांचे काही भविष्य नाही. त्यांनी अन्य कुठे जायला हवे. अमेरिका गाझा पट्टीवर कब्जा करणार आणि आम्ही एकत्र मिळून काम करू." त्यांनी पुढे सांगितले की, "गाझाला आम्ही आमच्या अधिकार क्षेत्रात घेऊ. तिथल्या सर्व धोकादायक बॉम्ब आणि हत्यारे नष्ट करू, उद्ध्वस्त झालेल्या इमारती पाडू. आम्ही गाझामध्ये नव्याने आर्थिक विकास करू, ज्यातून मोठ्या प्रमाणात नोकऱ्या आणि रहिवासी इमारती उभ्या राहतील. अमेरिकेने बनवलेल्या या गाझामध्ये जगभरातील लोक राहू शकतात."

ट्रम्प यांनी पुढे स्पष्ट केले की, "गाझाच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यासाठी जे काही शक्य असेल ते आम्ही करू. आम्ही अशा भागावर कब्जा करणार आहोत जिथे आम्ही पुढील काळात विकास करू." त्यांनी असेही नमूद केले की, गाझा पट्टीच्या पुनर्वसनाऐवजी पॅलेस्टिनींना नवीन ठिकाणी स्थायिक करण्याची व्यवस्था करणे अधिक योग्य ठरेल.

👉👉 हे देखील वाचा : पालकमंत्रिपदाच्या वादामुळे रायगडचा विकास आराखडा रखडणार?

यासंदर्भात नेतन्याहू यांच्यासोबत चर्चेच्या वेळी ट्रम्प म्हणाले की, अमेरिका गाझामधील विध्वंस रोखू शकते आणि आर्थिक विकास घडवू शकते. गाझा ताब्यात घेण्याच्या आणि विकसित करण्याच्या योजनेला जगातील सर्वोच्च नेत्यांकडून पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ट्रम्प यांच्या या विधानावर हमासने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हमासचे वरिष्ठ अधिकारी सामी अबू झुहरी म्हणाले, "अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे विधान गाझामध्ये तणाव वाढवण्याचे साधन आहे. आमचे लोक गाझामध्ये ही योजना राबवू देणार नाहीत." इजिप्त आणि जॉर्डननेही ट्रम्पचा प्रस्ताव नाकारला आहे.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

गाझा युद्धबंदीच्या अनुषंगाने ३ फेब्रुवारीपासून चर्चांना सुरुवात होणार आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील वाद शांत करण्यासाठी अमेरिका सतत दबाव आणत आहे.गेल्या १५ महिन्यांच्या संघर्षानंतर गाझामध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. १९ जानेवारी रोजी युद्धबंदी लागू झाल्यानंतर हजारो पॅलेस्टिनी नागरिक उत्तर गाझामध्ये परतले आहेत. इस्रायली हल्ल्यांत आतापर्यंत ४७ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले असून, १.१० लाखांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. 


सम्बन्धित सामग्री