अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. "नो किंग्ज" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निदर्शनांनी लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आता, ट्रम्प यांनी एआय व्हिडिओ शेअर करून यावर प्रतिक्रिया दिली आहे.
या संदर्भात, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथआउटवर दोन एआय व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते मुकुट परिधान केलेले दिसत आहेत. ते मास्क घालून लढाऊ विमानात बसले आहे आणि विमानावर 'किंग ट्रम्प' लिहिलेले आहे.
हेही वाचा - USA No Kings Protest: अमेरिकेत ‘नो किंग्ज’ आंदोलनाने ट्रम्प प्रशासनाला आव्हान; ५० राज्यांत नागरिक रस्त्यावर
"ते मला राजा म्हणत आहेत, पण मी राजा नाही," असं ट्रम्प यांनी 'फॉक्स बिझनेस'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. तसेच "डेमोक्रॅट नेहमीच सत्तेबाहेर राहतील आणि अध्यक्ष त्यांच्या हिताचे निर्णय घेत राहतील." हे विधान केल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी ट्रुथ प्लॅटफॉर्मवर एक एआय व्हिडिओ शेअर केला. त्यात ते मुकुट घालून लढाऊ विमानात बसून ट्रम्पविरोधी निदर्शकांवर बॉम्बफेक करताना दिसत आहेत.
हेही वाचा - China - India Relations: ट्रम्प यांची चिंता वाढली, चीनची भारतासोबत जवळीक, घेतला महत्वपूर्ण निर्णय
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनीही एक एआय व्हिडिओ शेअर केला, जो ट्रम्प यांनी पुन्हा पोस्ट केला. त्यात ट्रम्प डोक्यावर मुकुट ठेवताना दिसत आहेत, तर नॅन्सी पेलोसी सारख्या इतर विरोधी नेत्यांनी ट्रम्पसमोर गुडघे टेकले आहेत.