Farewell in Australia: भारतीय क्रिकेटचे दोन मोठे चेहरे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अलीकडेच टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली. हे दोघंही गेली कित्येक वर्षं टीम इंडियाचे आधारस्तंभ होते. पण त्यांच्या इतक्या मोठ्या योगदानानंतरही, बीसीसीआयकडून त्यांच्यासाठी एक खास फेअरवेल मॅच झालीच नाही. ही गोष्ट कित्येक चाहत्यांच्या मनाला लागली.
पण आता आश्चर्य म्हणजे, भारतीय बोर्डानं जरी काही केलं नाही, तरी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड (Cricket Australia) मात्र पुढं आलं आहे. त्यांनी ठरवलंय की विराट आणि रोहितसाठी ते स्वतः एक फेअरवेल सेरेमनी घेणार आहेत.
ऑस्ट्रेलियात होणार विराट-रोहितचं कौतुक
या वर्षाच्या शेवटी भारताची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथं तीन वनडे मॅचेस होणार आहेत. आणि याच दौऱ्यादरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलिया विराट आणि रोहितसाठी एक खास फेअरवेल सेरेमनी ठेवणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग म्हणाले, 'हे दोघं महान खेळाडू आहेत. आम्हाला माहित नाही की हा त्यांचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा आहे की नाही, पण आम्ही हे त्यांच्यासाठी खास बनवायचं ठरवलं आहे.'
भारतात नाही, पण ऑस्ट्रेलियात मिळणार मान
सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय की बीसीसीआयने अजूनही काहीच घोषणा का केली नाही. इतकी वर्षं देशासाठी खेळल्यानंतर, अशा दिग्गज खेळाडूंना एक सन्मानपूर्वक निरोप मिळणं योग्यच होतं. पण असं न झाल्यानं अनेक चाहते नाराज झाले आहेत.
विराट आणि रोहितचं योगदान
विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी भारतीय क्रिकेटला खूप काही दिलंय. विराटची आक्रमक बॅटिंग, कप्तानी आणि त्याचं मैदानावरचं जोशपूर्ण वागणं, तर रोहितचा क्लास, त्याचे मोठे स्कोअर आणि शांत नेतृत्व यांनी भारतीय संघ अनेकदा सामना जिंकला.
दोघांनी मिळून हजारो रन केले, शेकडो मॅचेस खेळल्या आणि अनेक रेकॉर्ड्स तयार केले. टी-20, वनडे, कसोटी सगळ्याच फॉरमॅटमध्ये हे दोघं सुपरस्टार राहिले.
ऑस्ट्रेलियाचा दौरा होणार खास
हा दौरा फक्त मॅचेससाठी नाही, तर भावनिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. विराट आणि रोहितचा हा कदाचित शेवटचा आंतरराष्ट्रीय दौरा असेल, म्हणून ऑस्ट्रेलिया त्यांना मान देणार आहे.