Monday, June 23, 2025 12:35:34 PM

जगातील सर्वात झपाटलेली अ‍ॅनाबेल बाहुली खरोखरच हरवली होती का? जाणून घ्या

लुईझियाना रिसॉर्टमध्ये आग लागल्यानंतर झपाटलेली अ‍ॅनाबेल बाहुली गायब झाल्याच्या अफवा पसरल्या. यामुळे अनेकांची झोप उडाली. याचे कारण म्हणजे या बाहुलीत 'राक्षसी आत्मा' वास्तव्य करत आहे.

जगातील सर्वात झपाटलेली अ‍ॅनाबेल बाहुली खरोखरच हरवली होती का जाणून घ्या

नवी दिल्ली: जर अशी एखादी गोष्ट असेल ज्यामुळे अनेकांना झोप उडाली असेल, तर ती म्हणजे अ‍ॅनाबेलची गोष्ट होय. ही गोष्ट 1970 च्या दशकातील आहे, जेव्हा अलौकिक अन्वेषक (Paranormal Activity Expert) एड आणि लॉरेन वॉरेन यांनी घोषित केले की अ‍ॅनाबेल बाहुलीमध्ये 'राक्षसी आत्मा' वास्तव्य करत आहे.

हेही वाचा: नागालँडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी सोडली साथ

लुईझियानातील व्हाइट कॅसलमधील ऐतिहासिक नॉटोवे प्लांटेशन, ज्याला आता नॉटोवे रिसॉर्ट म्हणून ओळखले जाते, मे महिन्यात झालेल्या आगीत ही कुप्रसिद्ध अ‍ॅनाबेल बाहुली पुन्हा एकदा चर्चेत आली. सुदैवाने, या आगीत कोणी जखमी झाले नाही. मात्र, सोशल मीडियावर काही लोकांनी असा दावा केला की, 'लुईझियानामधील ''डेव्हिल्स ऑन द रन टूर'' या अलौकिक दौऱ्यादरम्यान ही बाहुली बेपत्ता झाली होती आणि तिच्या गायब होण्याचा संबंध आगीशी जोडला गेला आहे'. न्यू इंग्लंड सोसायटी फॉर सायकिक रिसर्च (NESPR) ने आयोजित केलेल्या टूर दरम्यान काही पर्यटकांनी बाहुली पाहिली नसल्याचा दावा केल्यामुळे ही अफवा आणखी वाढली.

हेही वाचा: पुण्यात मनसेला मोठं खिंडार; सुमारे 100 मनसे कार्यकर्ते शरद पवार गटात

एक्सवर एका नेटिझनने पोस्ट केले की, '13 मे 2025 रोजी, कनेक्टिकटमधील सर्वात भयानक बाहुल्यांपैकी एक असलेली अ‍ॅनाबेल न्यू ऑर्लीन्स, लुईझियाना येथे हलवण्यात आली. 15 मे रोजी, नॉटोवे प्लांटेशन जळून खाक झाले. 16 मे रोजी, ऑर्लीन्स पॅरिश तुरुंगातून 11 कैदी पळून गेले. तेव्हा वॉरेन यांनी असा इशारा दिला की, अ‍ॅनाबेलला कधीही घेऊन जाऊ नये'.

ही बाहुली सहसा NESPR च्या वॉरेनच्या गूढ संग्रहालयात ठेवली जाते, ज्याची स्थापना एड आणि लॉरेन वॉरेन यांनी केली होती. मात्र, ही अफवा फार काळ टिकली नाही. NESPR चे प्रमुख अन्वेषक डॅन रिवेरा यांनी संग्रहालयातून फिरताना आणि लाकडी पेटीत बंद असलेल्या बाहुलीजवळ जातानाचा व्हिडिओ पोस्ट करून अफवांचे खंडन केले.

हेही वाचा: डॉक्टरांचा हलगर्जीपणा; प्रसूती दरम्यान महिलेच्या पोटात राहिला कापडी तुकडा

रिवेरा यांनी प्रेक्षकांना धीर देत म्हणाले, 'अ‍ॅनाबेल हरवली नाही. ती शिकागोमध्ये आहे'. पुढे त्यांनी सांगितले की, 'टीम 4 ऑक्टोबर रोजी रॉक आयलंड, इलिनॉय येथे होणाऱ्या 2025 च्या रॉक आयलंड रोडहाऊस एसोटेरिक एक्स्पोमध्ये सहभागी होणार आहे'.


सम्बन्धित सामग्री