Thu. Dec 2nd, 2021

‘या’ बाथटबमध्ये 1 तास अंघोळ करण्याची किंमत 3000 रुपये!

सार्वजनिक ठिकाणी स्नान म्हणजे आपल्याकडे नदी तलावात स्नान करायची पद्धत आहे. आता सार्वजनिक स्वच्छतागृहं ठिकठिकाणी दिसतात. येथे नाममात्र शुल्कात स्नानाची सुविधा आपल्याला मिळत असते. मात्र जपानमध्ये एका हॉटेलमध्ये खास बाथटबतयार करण्यात आला असून येथे अंघोळ करायचे 3000 रुपये भरावे लागतात. 3000 रुपयांत तुम्ही तासभर अंघोळ करू शकतात. तुम्ही म्हणाल असं काय विशेष आहे या स्नानामध्ये? तर या किमतीत तुम्हाला मिळतं सोन्याच्या बाथटबमध्ये अंघोळ करण्याचा आनंद.

जपानच्या नागासाकी शहरातील ‘हॉट स्प्रिंग’ हॉटेलमध्ये ‘रॉयल बाथ’चा अनुभव देणारं बाथटब तयार करण्यात आलं आहे. हे बाथटब 18 कॅरेट सोन्याचे मढवलेलं आहे.

4.2 फूट लांब आणि 2 फूट खोल असणाऱ्या बाथटबसाठी किलो सोनं वापरलं आहे. हा टब तयार करण्यासाठी 7.15 मिलियन डॉलर्स (50 कोटी रुपये) खर्च करण्यात आले आहेत. हा टब तयार करायलाही 8 महिने लागले होते.  

या सोन्याच्या टबमध्ये एकावेळी 2 जण बसून स्नान करू शकतात. त्यामुळे अनेक जोडपी शाही स्नानाचा आनंद घेण्यासाठी या हॉटेलला भेट देतात. यासाठी महिनोन् महिने वेटिंग लिस्ट असते. बुकिंग करून अनेक महिन्यांनी येथे नहाण्याची संधी मिळते. एका तासाचे 5,400 येन म्हणजे सुमारे 3 हजार रुपये इतके पैसे भरावे लागतात.

चीन, दक्षिण कोरिया येथील नागरिक या बाथटबमध्ये नहाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग करतात. या बाथटबची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *