Sat. Sep 21st, 2019

#WorldVadaPaoDay ट्राय करा वडापावचे वेगळे प्रकार

0Shares

वडापाव म्हणजे मुंबईचं ‘राष्ट्रीय खाद्य’ असं गमतीने म्हटलं जातं.  मात्र मुंबईकरांचा हा सर्वांत प्रिय पदार्थ आहे, यात मात्र शंका नाही. आज जागतिक वडापाव दिवस आहे.

वडापावमधील वडा हा बटाटेवडा असतो. हा पारंपरिक महाराष्ट्रीय पदार्थ आहे. घराघरात हा पदार्थ पूर्वापार बनवला जातो. मात्र तो पावाबरोबर खाण्याची पद्धती मुंबईतच सुरू झाली. गाडीवर वडापाव विकायला आणि खायला सुरुवात झाली ती 1966 पासून. दादर येथेच वडापावचा जन्म झाला.

दादरमधील अशोक वैद्य यांनी तसंच सुधाकर म्हात्रे यांनीही एकाच सुमारास गाडीवर वडापाव विकण्यास सुरुवात केली. त्यावेळी बटाट्याची भाजी आणि पोळी कामगार लोक रस्त्यावर खात असत. तेव्हा त्याहून कमी पैशात त्याच बटाट्याच्या भाजीला बेसनात भिजवून बटाटेवडे तळले जाऊ लागले आणि पोळीऐवजी पाव त्याच्याबरोबर देऊन वडापाव विकण्यास सुरुवात झाली. त्यावेळी जेमतेम 10 पैशांत वडापाव मिळत असे. गरीबांसाठी वडापाव वरदानच होतं. नाश्ता असो किंवा जेवण, एखाद दोन वडापाव खाऊन लोक सहज आणि स्वस्तात पोट भरू शकत होते. त्यामुळे वडापाव खूप प्रसिद्ध झाला.

त्याचवेळी दक्षिण भारतीयांविरोधात शिवसेनेने सुरू केलेल्या आंदोलनात वडापाव हा मुंबईकरांच्या खाद्यसंस्कृतीचा मानबिंदू ठरला. इडली, डोसा विकणाऱ्यांना उत्तर म्हणून मराठी लोकांचं खाद्य म्हणून वडापावला मान मिळवून दिला.

घाटकोपरला लक्ष्मण ओम वडापाव येथे मॅगी वडापाव मिळतो. वडापावच्या आत चक्क मॅगी असतं. त्यामुळे दोन्हींची टेस्ट मिळते.

ओशिवरा येथे चीज फॉण्ड्यू वडापाव मिळतो. यामध्ये छोटे छोटे 7 ते 8 वडापाव मिळतात. चिजमध्ये बुडवून वडापाव खाता येतो.

मुंबईतल्या फर्जी कॅफे या मोठ्या रेस्टोरंटमध्ये हिडन वडापाव मिळतो. यामध्ये वड्याच्या आतमध्ये पाव असतो.

असे वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव मुंबईत मिळतात.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *