दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोना व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोना व्हेरिएंटमुळे आता जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे इतर देश सतर्क झाले असून अनेकांनी देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारही कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ठोस पावले उचलत आहे.
दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्यामुळे जगात पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच जागितक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)ने कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटला धोकादायक आणि वेगाने पसरणारा व्हेरिएंट असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे इतर देश सतर्क झाले असून या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी महत्वाची पावले उचलत आहेत.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट धोकादायक असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. डीजीसीए याबाबत बैठक घेणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर डीजीसीए दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच भारताच्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट दौऱ्यावरही परिणामाची चिन्हे दिसत आहेत.