Sat. May 25th, 2019

‘कुस्ती’ला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळावा – बजरंग पुनिया  

0Shares

राष्ट्रकुल आणि आशियार्ई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने कुस्ती हा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित व्हायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली.

बजरंगने 3 ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून दिले आहे. पद्म पुरस्कार प्राप्त बजरंग म्हणाला की, कुस्ती हा असा खेळ आहे ज्यामध्ये भारताने 3 ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले आहे.

जो खेळ देशाला पदक मिळवून देतो त्याला राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात कोणतीच अडचण नसावी, असे मतही त्याने व्यक्त केले.

यापूर्वी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांनी देखील सरकारने कुस्तीला राष्ट्रीय खेळ घोषित करण्याची मागणी केली होती.

भारतात हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे. मात्र 7 वर्षांपूर्वी एका आरटीआयमध्ये केंद्र सरकारने आपल्या उत्तरात म्हटले होते की देशाला 8 ऑलिम्पिकसुवर्णपदक मिळवून देणाऱ्या या खेळाला राष्ट्रीय खेळाचा अधिकृत दर्जा मिळालेला नाही. त्यावरून कुस्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

बजरंग प्रजासत्ताकदिनी पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंमध्ये समाविष्ट आहे. या पुरस्काराने तो उत्साही आहे. परंतु आपणास राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार न मिळाल्याची खंतही आहे, असेही त्याने सांगितले.

पद्म पुरस्काराचे महत्त्व काही वेगळेच आहे. मी ते चांगले जाणतो, परंतु राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार न मिळाल्याने थोडा निराश झालो होतो. मात्र, योगी भाईने (योगेश्वर दत्त) मला खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.

एखादा खेळाडू पुरस्काराचा हक्कदार असेल तर त्याला तो नक्कीच मिळायला हवा. त्याने त्याचे मनोबल उंचावते. असे तो म्हणाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *