Fri. Aug 12th, 2022

विकीपिडीयावर शरद पवारांच्या माहितीशी छेडछाड

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.राजकीय नेत्यांवर एखाद्या सभेत टीका होणं हे तर प्रत्येक निवडणुकीत होतच असतं. परंतु या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवारांवर थेट विकीपीडीयावरचं टीका करण्यात आली आहे. शरद पवार हे देशातील सर्वात जास्त भ्रष्ट राजकारणी अशी माहिती विकीपिडीयावर टाकण्यात आली होती.

ही माहीती सध्या बदलण्यात आली असली तरी ऐन निवडणुकीत असा प्रकार घडल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.ही माहीती नेमकी कोणी टाकली आहे. हे अद्याप समजू शकले नाही.परंतू शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.तरीही त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. विकीपीडीयावरील माहीती जगभर पोहचत असल्याने याची दखल गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

विकीपिडीयावर हे इंटरनेटवरील सर्वात जास्त वापरले जाणारे माहितीचे स्त्रोत आहे.

कोणत्याही विषयाची,व्यक्तीची माहीती यावरती सहज उपलब्ध होते.

शरद पवार हे देशातील सर्वात जास्त भ्रष्ट राजकारणी अशी माहिती विकीपिडीयावर टाकण्यात आली होती.

ऐन निवडणुकीत अशी टीका केल्याने शरद पवार यांच्याविषयीची ही माहीती सर्वत्र पोहचवल्याचे म्हटलं जात आहे.

विकीपिडीयावर कोणीही स्वत: कडे असणारी माहीती टाकू शकते.फक्त त्याचा लॉग इन आणि आयडी घ्यावे लागते.

विकीपीडीयावरील माहीती जगभर पोहचत असल्याने याची दखल गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते.

मात्र, आपला नातू पार्थ पवार यांच्यासाठी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.