Wed. May 22nd, 2019

न्यूझीलंड हल्ल्यातील आरोपीस 5 एप्रिलपर्यंत कोठडी

44Shares

न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरात दोन मशिदींवर मुळचा ऑस्ट्रेलियाचा नागरिक असणाऱ्या २८ वर्षीय ब्रेन्टन टॅरेन्टने  हल्ला केला. दोन मशिदींमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 49निष्पाप नागरीकांचा मृत्यू झाला. तर ४१ लोकं जखमी झाले आहेत.मलेशिया, तुर्की, सौदी अरेबिया, भारत, अफगाणिस्तान या देशाचे नागरिकही या हल्ल्यात ठार झाले आहेत.मशिदीवर हल्ला झाल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी ब्रेन्टन आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांन जेरबंद केलं. 28 वर्षीय ब्रेन्टन टॅरेन्ट याला स्थानिक न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर ख्राइस्टचर्च शहरातील अल नूर आणि लिंगवूड मशिदीत गर्दी होती.

मुळचा ऑस्ट्रेलियाचा नागरिक असणाऱ्या २८ वर्षीय ब्रेन्टन टॅरेन्टने दोन मशिदींवर अंदाधुंद गोळीबार केला.

हल्ल्यादरम्यान हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केलं होतं.

हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला होता.

या हल्ल्यात ४९ लोकं ठार झाले आहेत तर ४१ लोकं जखमी झाले आहेत.

मलेशिया, तुर्की, सौदी अरेबिया, भारत, अफगाणिस्तान या देशाचे नागरिकही या हल्ल्यात ठार झाले आहेत.

ख्राईस्टचर्चच्या वेगवेगळया भागात कारमध्ये स्फोटके सापडली. ही सर्व स्फोटके निकामी करण्यात आली.

हल्ल्यानंतर काही तासांतच आरोपी अटकेत

मशिदीवर हल्ल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी ब्रेन्टन आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांना जेरबंद केलं.

ब्रेन्टन टॅरेन्ट एकेकाळी फिटनेस प्रशिक्षक होता. आज सकाळी स्थानिक कोर्टासमोर त्याला हजर करण्यात आले.

स्थलांतरित मुसलमानांना हकलण्यासाठी आणि युरोपच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी हा हल्ला केल्याचं ब्रेन्टनने म्हटलं आहे.

दोन वर्षांपासून ब्रेन्टन या हल्ल्याची तयारी करत असून अत्यंत थंड डोक्याने बेत आखून हा हल्ला केल्याचं त्याने सांगितले आहे.

याप्रकरणी पुढील सुनावणी ५ एप्रिलला होणार असून इतर तीन आरोपींची चौकशी सुरू आहे.

दरम्यान न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी हा काळा दिवस असून अशा हिंसाचाराला न्यूझीलंडमध्ये अजिबात स्थान नाही असे म्हटले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *