राज ठाकरेंना वाय प्लस दर्जाची सुरक्षा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारपासून राज ठाकरेंना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत एक अंमलदार आणि एक पोलीस अधिकारी वाढवण्यात आला आहे. मात्र, राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ होऊनही मनसेमध्ये नाराजी दिसत आहे.
सुरक्षेत वाढ होऊनही मनसे नाराज
राज ठाकरेंना शुक्रवारपासून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ होऊनही मनसे नाराज झाली आहे. राज ठाकरेंना झेड दर्जाचे सुरक्षा कवच देण्याची मागणी मनसे करत आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ झाली असून मनसे नाराज असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, राज ठाकरेंना धोका नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. मात्र, आता राज ठाकरेंना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी मनसे नेत्यांनी केली आहे. मात्र, राज ठाकरेंना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सुरक्षेकडे मविआचे दुर्लक्ष झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अयोध्यादौऱ्यापूर्वी राज ठाकरेंना झेड सुरक्षा मिळण्याची मागणी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.