Sun. Sep 19th, 2021

यामी गौतमनं शेअर केले लग्नातील फोटो, नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा केला वर्षाव

मुंबई : अभिनेत्री यामी गौतम (Yemi Gautam) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. यामीनं उरी चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) यांच्याशी लग्न केलं आहे. यामी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करू तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा केला वर्षाव केला आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर यामीने प्रसिद्ध मिळाली. यामीने अचानक शुक्रवारी लग्नाचे फोटो शेअर केले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. हिमाचल प्रदेशात यामी आणि आदित्यचं लग्न अगदी साध्या पद्धतीनं पार पडलं. आहे. कोरोनामुळे हा लग्नसोहळा फार कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा झाला. आता या लग्नसोहळ्याचे यामीने फोटो शेअर केले आहेत. यामी आणि आदित्यनं कुटुंबाच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्धतीनं लग्न केलं. लग्नानंतर यामीचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आदित्यनं उरीच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. यामी या सिनेमात एका विशेष भूमिकेत दिसली होती, मात्र चाहत्यांच्या मनात एक प्रश्न आहे की या दोघांचं नातं कधी आणि कसं सुरू झालं. कारण यापुर्वी यामी आणि आदित्य नाव कधीहीचं सोशल मीडियावर चर्चेत नव्हत त्यामुळे यामीच्या चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *