Fri. Nov 27th, 2020

यवतमाळ जिल्ह्यात 59 जणांची कोरोनावर मात दोघांचा मृत्यु ; 39 नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ जिल्ह्यात 39 जण नव्याने पॉझेटिव्ह…

यवतमाळ, दि. 18 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 59 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 24 तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 39 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.

मृतकांमध्ये वणी तालुक्यातील 72 वर्षीय आणि उमरखेड तालुक्यातील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 493 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 39 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 454 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 301 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10847 झाली आहे. 24 तासात 59 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 10160 असून आतापर्यंत 359 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 97783 नमुने पाठविले असून यापैकी 97402 प्राप्त तर 381 अप्राप्त आहेत. तसेच 86555 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *